Dhananjay Munde allegations : धनंजय मुंडेंमुळे माझ्या आईने जीवन संपवलं; करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

Karuna Munde Levels Serious Allegations Against Dhananjay Munde in Beed : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेविरोधात करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
Dhananjay Munde allegations
Dhananjay Munde allegationsSarkarnama
Published on
Updated on

Karuna Munde vs Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी करुणा मुंडे पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आपल्या आईने आत्महत्या केली. तसे आपल्याकडे पुरावे आहेत, असा खबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

तसंच मनोज जरांगे यांच्या भेटीवर भाष्य करताना, पुन्हा एकदा सर्व पुरावे घेऊन भेटणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय धनंजय मुंडेबरोबर मंत्री पंकजा मुंडेंवर देखील त्यांनी निशाणा साधला.

करुणा मुंडे म्हणाल्या, "धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अगोदर सांगितले होते की, अंगावर आले, तर शिंगावर घ्या, त्या अगोदर पंकजा मुंडे यांनी देखील कोयते घासून ठेवा, असे म्हटले होते . हे फक्त आपल्या समाजाच्या लोकांसाठी आहे. हे लोक स्वतः काही करत नाही. फक्त लोकांनी करायचं. मी अंगावर गेले होते, परळी विधानसभेमध्ये अर्ज देखील भरला होता. पण माझा अर्ज अवैध ठरवण्यात आला. अर्जाचा सूचक होता, त्याला उचलून नेले. दमदाटी केली. मी अंगावर आली होती, घ्यायचं होतं शिंगावर, होऊन जाऊन द्यायचे होते, नवरा-बायकोमध्ये लढाई. पण तुम्ही तसं केलं नाही. मोठ्या मोठ्या भाषणामध्ये लोकांची दिशाभूल करणार. कोयते घासून ठेवा, अंगावर आले तर शिंगावर घ्या, एवढचं म्हणत राहणार."

'आता जातीपातीचा राजकारण सुरू आहे. हे मुद्दे घेऊन ही लोक राजकारण करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Election) रस्ता, नाली, पाणी, शेतकरी कसा सक्षम झाला पाहिजे, असे मुद्दे असायला हवेत. महिलांच्या हातामध्ये रोजगार कसा भेटला पाहिजे, असे मुद्दे पाहिजे. या लोकांना समाजाच्या जातीच्या नावावर मते घेऊन समाजालाच खच्ची करायचे आहे,' असा टोला देखील करुणा मुंडे यांनी लगावला.

Dhananjay Munde allegations
Taiwan T-Dome air defense System : चीनला धडकी भरवणार तैवानचे 'टी-डोम'; बॅलिस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्राबरोबरच स्टेल्थ लढाऊ विमानांना भेदणार

कारखाना विक्रीवर भाष्य

'मुंडे साहेबांकडे बघून कारखान्यांसाठी लोकांनी जमिनी दिल्या होत्या. पण आता हे कारखाने विकले गेले आहेत. लोकांना त्यांच्या जमिनीचे पैसे देखील मिळाले नाही. लोकांचे 40-40 कोटी रुपये थकलेले आहेत. आज डान्स काम करणाऱ्यांना 20 कोटी रुपयांचा मुंबईमध्ये स्टुडिओ करून दिले जात आहेत. मात्र इकडे लोकांचे पैसे मिळत नाही. कारखान्यांमध्ये सर्व वंजारी समाजाच्या जमिनी आहेत,' असा दावा देखील करुणा मुंडे यांनी केला.

Dhananjay Munde allegations
Eknath Shinde: शिंदेंची शिवसेना घेणार लिटमस टेस्ट! झेडपीच्या रिझल्टनंतरच महापालिका...

आईने आत्महत्या केली

'धनंजय मुंडेंकडून मुलींना होणारा त्रास पाहून, माझी आई न्यायालयात आणि पोलिसांकडे न्यायासाठी जाणार होती. त्यावेळेस त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला, यातून त्यांनी आत्महत्या केली. 2022 मध्ये मी न्यायालयात गेल्यानंतर माझ्या बहिणीने या सर्व प्रकारावर भाष्य करण्यास सुरूवात केली आणि केस केली,' असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

जरांगे यांच्या भेटीवर करुणा यांची प्रतिक्रिया

करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, "जरांगे यांना माझ्यावर झालेल्या अन्यायाचे पुरावे देणार होते. बीडमधील ज्ञानेश्वरीताईंना न्याय मिळावा यासाठी जरांगे उभे आहेत, तसे मी देखील त्यांच्याकडे न्यायासाठी बळ मागण्यासाठी गेले होते. जरांगे हे राजकारणी नाहीत, ते सर्वसामान्यांसाठी उभे आहेत. तरी देखील मी पुरावे घेऊन पुन्हा जरांगे यांना पुन्हा भेटणार आहे."  मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीत, मी महिलेला पुढे करून लढत नाही, तो तुमचा कौटुंबिक वाद आहे, त्यात आपण पडणार नाही, असे स्पष्ट करत, मुंडेंना धडा शिकवण्यासाठी समोरासमोर मी सक्षम आहे, असेही म्हटल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com