Eknath Shinde: शिंदेंची शिवसेना घेणार लिटमस टेस्ट! झेडपीच्या रिझल्टनंतरच महापालिका...

Eknath Shinde: शुक्रवारी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत अनेक नेत्यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत.
Municipal Council mayor Election And Eknath Shinde
Municipal Council mayor Election And Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Shivsena Nagpur News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार नाही याची शंका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही वाटत आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांनी ती व्यक्त केली. निवडणूक जाहीर झाल्यावर महायुतीबाबत जे व्हायचे ते होईल, त्यापूर्वी आपली तयारी करून ठेवण्याचे निर्देश या बैठकीत शिवसैनिकांना देण्यात आले. झेडपी आणि नगर पालिकांची निवडणूक आधी होणार आहे. या निवडणुकीचे निकाल बघून महापालिकेत युती करायची की नाही याचा निर्णय घ्यायचा असा धोरणात्मक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते. हे बघता आता युती होणार नाही हे एकदाचे स्पष्ट झाले आहे.

Municipal Council mayor Election And Eknath Shinde
Raj Thackrey: भाजपचं आता ऑपरेशन 'राज ठाकरे'? गिरीश महाजनांचं सूचक विधान

शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शुक्रवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांची तातडीची बैठक मुंबईतील दादा भुसे यांच्या संग्राम बंगल्यावर बोलावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तिथेच युती केली जाईल नसेल तिथे मैत्रिपूर्ण लढती होतील, महायुतीचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येतील असे सांगितले होते.

Municipal Council mayor Election And Eknath Shinde
Top 10 News: भर सभेत भुजबळांनीही म्हटलं.. 'लाव रे तो व्हिडिओ' ते शिवसेनेचा 'पहिला आमदार' ठाकरेंची साथ सोडणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सर्वांनाच लढायची असते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. येथे इच्छुक उमेदवारांची संख्याही जास्त असते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले होते. विदर्भात भाजपचे नेटवर्क मोठे आहे. इतरांच्या तुलनेत आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. कार्यकर्तेसुद्धा लाखोंच्या संख्येने आहे. भाजपालाच जागावाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे बघता विदर्भात तरी युतीची शक्यता दिसत नाही. याचा अंदाज आल्याने शिंदे सेनेच्यावतीने तातडीने विदर्भातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले होते. या बैठकीत नेत्यांनी जी भूमिका मांडली त्यातून युती होणार नाही असाच अंदाज बांधला जात आहे.

Municipal Council mayor Election And Eknath Shinde
Chhagan Bhujbal: भर सभेत भुजबळांनीही म्हटलं.. लाव रे तो व्हिडिओ! वडेट्टीवारांना खिंडीत पकडलं अन् विखेंसह भाजपला दिला इशारा

जिल्हा परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणूक आपल्याला स्वबळावर लढायची आहे. ज्या ज्या मतदारसंघात आपली ताकद आहे तेथे आत्तापासूनच सक्षम उमेदवार शोधून ठेवा. निवडणुकीच्या तयारीला लागा. युती होईल की नाही याची चिंता करू नका, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तोपर्यंत आपले काम चालू द्या. युती झाली तर ठीक नाही झाली तर तयार राहा अशाही सूचना देण्यात आल्या. ग्रामीणच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद दिसेल. या निवडणुकीचा जो निकाल लागेल तो बघून महापालिकेच्या निवडणुकीत युती करायची की नाही हे आपण ठरवू असे सांगण्यात आले. शिवसैनिकांनीसुद्धा स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी केली. निवडणूक लढल्यास आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते मोठे होतील असे मत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com