Karuna Sharma - Munde News : करुणा मुंडेंची मोठी घोषणा! रेणापूर ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत 'या' मागणीसाठी काढणार लॉंग मार्च

Shivshakti Sena Political News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणार...
Karuna Munde Latest News
Karuna Munde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur : शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा- मुंडे या नेहमीच चर्चेत असतात. तसेच त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणूक ही कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून लढविणार असल्याचा इशाराही दिला आहे. याचवेळी आता त्यांनी राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी हजारो कोटींचा निधी जाहीर केला असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तसेच त्यांनी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रेणापूर ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Karuna Munde Latest News
Pimpri Chinchwad BJP : पिंपरी चिंचवड भाजप जम्बो कार्यकारिणी जाहीर; कुणाचा पत्ता कट, कुणाची वर्णी?

करुणा मुंडेंनी(Karuna Munde) माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीतील घोषणांवर सडकून टीका केली. मुंडे म्हणाल्या, राज्यातील सरकारने मराठवाड्याला हजारो कोटींचा निधी दिला‌ आहे. तो निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नुसती घोषणा करून चालणार नाही. शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांनी अनेक आंदोलन केली, मोर्चे काढले. त्याच धर्तीवर राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकजूट करून हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. तसेच राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली.

एकेकाळी रेणापूर विधानसभा मतदारसंघ गोपीनाथ मुंडेंचा गड...

करुणा शर्मा- मुंडे म्हणाल्या, रेणापूर, परळी आणि लातूर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी या लाँग मार्चमध्ये सहभागी होत आहेत. तसेच या लॉंग मार्चमध्ये येणाऱ्या मार्गातील अनेक शेतकरी या मार्चमध्ये सहभागी होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांचा रेणापूर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी गड मानला जात असत. याच ठिकाणावरून अनेक आंदोलनं उभी करण्यात आली होती. तसेच आंदोलन उभे करण्याचा संकल्प यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे.

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी करुणा मुंडेंच्या गाडीवर हल्ला...

शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्या मूळच्या मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने त्या मुंबईत राहात आहेत. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना उजेडात आली आहे. बुधवारी मध्यरात्री करुणा शर्मा यांच्या घराजवळच ही घटना घडली. हल्लेखोरांनी करुणा यांच्या कारच्या काचा फोडल्या. तसेच कारचे दरवाजे उघडण्याचाही प्रयत्न केला, असे यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

करुणा शर्मा यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्ंयांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. तसेच त्यांच्या कारचा दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Karuna Munde Latest News
Sharad Pawar News : ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या 'या' नेत्याच्या मुलाने घेतली थेट शरद पवारांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com