Sharad Pawar News : ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या 'या' नेत्याच्या मुलाने घेतली थेट शरद पवारांची भेट

NCP Political News : आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे या भेटीला राजकीय दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nashik : गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. नाशिकमध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते बबनराव घोलप नाराज असताना त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. ते शिर्डी मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, ठाकरे गटात सध्या शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे की घोलप असा पेच निर्माण झाला आहे.

बबनराव घोलप यांचे सुपुत्र आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे देवळाली मतदारसंघासह शिर्डीतही चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar
Hansraj Ahir News : "...म्हणून 'त्या' कंपनीला संपूर्ण राज्यात काळ्या यादीत टाका!" ; हंसराज अहिर संतापले

देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे वरवर सांगितले जात असले तरी भेटीत देवळाली मतदारसंघाविषयी राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, दिनेश धात्रक, उमेश खातळे, मनोज पालखेडे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे या भेटीला राजकीय दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात योगेश घोलप(Yogesh Gholap) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवू शकतात.

दरम्यान, घोलप यांनी प्रवेश केल्यावर विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली. याविषयी गुढ असले तरी राजकीय चर्चा नक्की झाली असून लवकरच माजी आमदार योगेश घोलप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भविष्यात देवळाली विधानसभा मतदानसंघात योगेश घोलप आणि सरोज अहिरे अशी राजकीय लढाई मतदारांना पहायला मिळू शकते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हा प्रमुख गणेश गायधनी यांनी ही भेट घडवून आणल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

शिवसेनेचे ठाकरे गटाचे बबनराव घोलप(Babanrao Gholap) यांना शिडी मतदारसंघाची जबाबदारी देत सहसंपर्क प्रमुख पद देण्यात आले होते. त्या नंतर बबनराव घोलप यांनी शिडी मतदारसंघात काम करत पक्ष वाढ होते. तसेच त्यांना येथून खासदारांची निवडणूक लढवय्या ची होती. बबनराव घोलप तंत्रिक अडचण आल्यास ते योगेश घोलप यांना येथून खासदार उभे करणार होते. मात्र, अचानक शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्ष घेत सहसंपर्क पद काढून घेण्यात आले. त्यामुळे बबनराव घोलप नाराज झाले. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, सविस्तर महिती दिली.

Sharad Pawar
Babanrao Gholap Shridi Loksabha : 'शिर्डी' लोकसभेसाठी घोलपांनी ठोकला शड्डू; ठाकरेंची धाकधूक वाढली

यावेळी राऊत यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी बोलून निरोप देतो असे सांगितले होते. मात्र, निरोप न आल्यामुळे बबनराव घोलप यांनी चर्मकार समाज मेळावा रविवारी मुंबई येथे घेतला. याच माजी आमदार योगेश घोलप यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी समवेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय घडामोडींना देवळाली मतदारसंघातून वेग येत आहे. त्याचबरोबर देवळाली मतदारसंघातून शिवसेनेकडून घोलप कुटुंब सलग पाचवेळा या भागातून आमदारकीचे नेतृत्व केले आहे.

मात्र, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे निवडून आल्या. त्यांनी योगेश घोलप यांचा पराभव झाला. सन 2024 होणाऱ्या निवडणुकींसाठी सगळेच कंबर कसत असताना रविवारी माजी आमदार योगेश घोलप यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योगेश घोलप प्रवेश करणार का ? असा सवाल उपस्थित होते आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar
Bacchu Kadu On Guwahati: ....नाही तर मी गाडीतून उतरतो; बच्चू कडूंनी दिली होती एकनाथ शिंदेंना धमकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com