Beed News, 15 Mar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात पत्नी करुणा शर्मा यांच्या मिळकतीचा उल्लेख केला नव्हता. या प्रकरणी करुणा शर्मा मुंडेंविरोधात तक्रार केली होती.
याच तक्रारीवर शनिवारी (ता.15) परळी न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीपूर्वीच करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पुन्हा एकदा मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंच्या आमदारकीबाबत मोठा दावा केला आहे. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी करूणा शर्मा यांनी मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती.
करुणा शर्मा यांनी मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ३-३-२०२५ ला राजीनामा होणार' असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा देताच अनेकांनी शर्मा यांची फेसबुक पोस्ट खरी ठरल्याचं म्हटलं होतं.
अशातच आता करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाईल असा मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, धनंजय मुंडेंनी निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. 2014 पासून माझं आणि माझ्या मुलांचं नाव टाकलं नव्हत यावर निवडणूक आयोगाने (Election commission) आक्षेप देखील घेतला नाही.
तर 2024 मध्ये मुलांचं नाव टाकलं पण माझं नाव गायब केलं. याबाबतच माझी लढाई असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच याच केसमध्ये आता त्यांच्याविरोधात वॉरंट निघेल आणि सहा महिन्यांची शिक्षा होईल. जसं मी याआधी म्हटलं होतं की, मंत्रीपद जाणार तर ते गेले.
आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, अशी भविष्यवाणीच त्यांनी यावेळी केली. त्यामुळे आता खरंच धनंजय मुंडेंना आपली आमदारकी गमवावी लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.