Beed News : तेलंगणात सत्तेत असताना भारत राष्ट्र समितीत ( बीआरएस ) प्रवेश आणि पदांसाठी बीड जिल्ह्यात रस्सीखेच होती. पण, तेलंगणातील सत्ता जाताच जिल्ह्यात 'बीआरएस'ला गळती सुरू झाली आहे. आता दिलीप गोरे यांनी बीड जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा दिली आहे. "तेलंगणातील पराभवानंतर पक्ष दिशाहीन व नेतृत्वहीन झाला आहे," असं गोरेंनी म्हटलं.
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Kcr ) यांनी तेलंगणात राष्ट्र समितीचे ( टीआरएस ) चे नामकरण भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) करून देशभरात घोडदौड करण्याचे प्रयत्न केले. मागील वर्षी महाराष्ट्रातही पक्षाचे वारे वाहिले. अनेक तरुण कार्यकर्ते व इतर पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांना या पक्षाने भुरळ पाडली. तेलंगणाला भेटी देऊन तेथील विकासाच्या मॉडेलचे महाराष्ट्रात गुणगाण होऊ लागले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीड जिल्ह्यात या पक्षाच्या पदांसाठी रस्सीखेचही पाहायला मिळाली. मात्र, मध्यंतरी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत 'बीआरएस'चा दारुण पराभव झाल्यानंतर त्याचे परिणाम आता जिल्ह्यातही दिसत आहेत. पक्षाचे जिल्हा समन्वयक असलेल्या दिलीप गोरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिलीप गोरे बीडचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.
दिलीप गोरे म्हणाले, "जिल्ह्यात 'बीआरएस'चे संघटन उभे करताना 50 हजारांपेक्षा अधिक सदस्य नोंदणी केली. आपल्याला विधानसभा निवडणूक लढविण्याची बाब केसीआर यांनाही माहीत आहे. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील अपयश व केसीआर यांना झालेल्या अपघातानंतर पक्ष पदाधिकारी व नेतृत्वाचा संपर्काचा अभाव झालेला आहे."
"देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, 'बीआरएस' पक्षाची महाराष्ट्राची अद्यापपर्यंत महाराष्ट्र अथवा हैदराबादमध्ये एकही बैठक झाली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत," असं गोरेंनी सांगितलं.
"महाराष्ट्रात 'बीआरएस' पक्ष नेतृत्वहीन आणि दिशाहीन झाला आहे. 'बीआरएस'कडून महाराष्ट्रासाठी कुठलाही राजकीय अजेंडा, सामाजिक अथवा निवडणुकीबाबत ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळे राजीनामा देत आहे," असं गोरेंनी म्हटलं.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.