Parbhani Politics News : RSS च्या खटिंग यांच्या भाजप प्रवेशाने महाविकास आघाडीला धक्का

Kedar Khating In Bjp Setback To Mahavikas Aghadi : खंटिंग यांच्या भाजप प्रवेशाने परभणीतलं राजकारण ढवळून निघणार...
Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar Khating
Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar KhatingSarkarnama
Published on
Updated on

Parbhani BJP News :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केदार खटिंग यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहे. भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांना हा प्रवेश फार सुखावह नसल्याचे बोलले जात आहे. कारण डॉ. केदार खटिंग यांना येणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती.

लोकसभेला उमेदवारी मिळाली नाही तरी, परभणी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी खटिंग हे प्रमुख दावेदार असण्याची शक्यता आहे. परभणी विधानसभा निवडणूक प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी 2019 मध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. डॉ. खटिंग यांच्या प्रवेशाने आता Parbhani विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी कोणास मिळते याबाबत चुरस निर्माण झाली आहे.

Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar Khating
Breaking News : परभणीत भाजपचं धक्कातंत्र; लोकसभेचा उमेदवार ठरला ? केदार खटिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अतिशय महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या जिल्हा संघचालक पदावर डॉ. खटिंग यांनी काम केले आहे. त्यामुळे परभणी शहर व जिल्ह्यात संघ परिवारात त्यांचा संपर्क आहे. डॉ. खटिंग यांनी संघ काम थांबवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच महाविकास आघाडीलाही आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील हे ठाकरे गटात आहेत. परभणी लोकसभा व विधानसभा मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधी ठाकरे गटाचे असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हे अजित पवार गटासोबत गेल्याने शरद पवार गटाची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला नव्या दमाच्या चेहऱ्याची आवश्यकता होती.

महायुतीने संघाच्या डॉ. खटिंग यांना पक्षात प्रवेश देऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षाला धक्का दिल्याचे मानले जात आहे. नव्या दमाचा चेहरा, उच्चविद्याविभूषित व संघाच्या माध्यमातून संपर्क असल्याने महाविकास आघाडीला डॉ. खटिंग यांच्या प्रवेशामुळे मोठा धक्का बसला असल्यास आश्चर्य नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजय जाधव यांची तिसरी टर्म असेल तर आमदार डॉ. राहुल पाटील यांची दुसरी. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधीना प्रस्थापितविरोधी जनमताचा फटका बसण्याची शक्यता आहे.

edited by sachin fulpagare

Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar Khating
Ashok Chavan : रामनामाचा आधार घेत टीका, अशोक चव्हाणांवर हिंदू मतदार नाराज?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com