Breaking News : परभणीत भाजपचं धक्कातंत्र; लोकसभेचा उमेदवार ठरला ? केदार खटिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election : 'सरकारनामा'ची बातमी खरी ठरली; केदार खटिंग भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा
Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar Khating
Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar KhatingSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा संघचालक डॉ. केदार खटिंग यांनी आज (ता. 24) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यास जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची उपस्थिती होती.

केदार खटिंग हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) संभाव्य उमेदवार असल्याची बातमी 'सरकारनामा'ने यापूर्वीच दिली होती. पार्टी विथ डीफरन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपमध्ये उमेदवार निवडताना अनेकदा धक्कातंत्राचा अवलंब केला जातो. राज्यपाल, लोकसभा सभापती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती या पदांवर नियुक्ती करताना चर्चेत नसलेले चेहरे पक्षाने पुढे केले आहेत. अशाच धक्कातंत्र पद्धतीला अनुसरून परभणी लोकसभा मतदारसंघाचा (Parbhani Loksabha Constituency) उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar Khating
Parbhani BJP : परभणीत लोकसभेला उमेदवार देतांना भाजपचे धक्कातंत्र ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या खटिंग यांच्या नावावर भाजपच्या गोटात गुप्तपणे विचार सुरू होता. 'सरकारनामा'ने या संदर्भात सर्वप्रथम वृत्त दिले होते. त्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. डॉ. केदार खटिंग यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करून घेण्यात आल्याने परभणी लोकसभा मतदारसंघातून तेच उमेदवार असतील याला एकप्रकारे पुष्टी मिळाल्याचे दिसते.

भाजपमध्ये अनेकदा राजकीय परिघाबाहेरील उमेदवार दिला जातो. विशेषत: पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यरत व्यक्तिमत्व जाणीवपूर्वक निवडले जाते. वर्षानुवर्षे तेच ते चेहरे असल्याने नकारात्मकता निर्माण झालेली असताना नवा चेहरा दिला तर त्यांच्याविषयी जनतेत उत्सुकता असते, असा तर्क सांगितला जातो. परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावा यासाठी अजित पवार आग्रही आहेत. असे असताना भाजपनेही उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली आहे. पक्षाने लोकसभा समन्वयक, निवडणूक प्रमुख नेमले असून विधानसभानिहाय आढावा बैठकाही सुरू केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणाच्या अक्षता घरोघरी वाटण्यात आल्या तेव्हा या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी व शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. केदार खटिंग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाला तर डॉ. खटिंग हे महायुतीचे उमेदवार असण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

डॉ. खटिंग हे शहरातील आघाडीचे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आतापर्यंत भाजपकडून आमदार मेघना बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांच्या नावाची जिल्ह्यात चर्चा सुरू होती.

या सगळ्या दिग्गज नावांना मागे सारत खटिंग यांचे नाव भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या डोळ्यासमोर असल्याचे त्यांच्या खटिंग यांच्या भाजपप्रवेशाने स्पष्ट झाले आहे. आता भाजपकडून खटिंग यांच्या परभणी लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election) उमेदवारीची घोषणा कधी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Avinash Chandane)

Chandrashekhar Bawankule, Dr. Kedar Khating
Nanded BJP News : मीच जिल्हाध्यक्ष म्हणणाऱ्या सुधाकर भोयर यांना नारळ, चिखलीकर समर्थकाची वर्णी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com