Mahadev Munde Case : विजय बांगरची पोलीसांकडून सहा तास चौकशी, जबाबही नोंदवून घेतला! महादेव मुंडेंचे खूनी सापडतील का?

Kej police have recorded the statement of Vijay alias Bala Bangar in the Mahadev Munde murder case. : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे बाळा बांगर यांचा जबाब पोलीसांनी घ्यावा आणि आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली होती.
Mahadev Munde Murder Case News Beed
Mahadev Munde Murder Case News BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एकेकाळचा सहकारी असलेल्या विजयसिंग उर्फ बाळा बांगर याची केज पोलीसांनी काल कसून चौकशी केली. काही दिवसापुर्वी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेऊन बाळा बांगर याने महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरूनच त्याच्या लोकांनी केल्याचा आरोप केला होता.

एवढेच नाही तर महादेव मुंडेंच्या गळ्याचे मास पुरावा म्हणून वाल्मीक कराडच्या (Valmik Karad) समोर ठेवण्यात आले होते. त्यानंतर खून करणाऱ्यांना त्याने गिफ्ट म्हणून गाड्याही दिल्याचा खळबळजनक दावा बांगर याने केला होता. त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे बाळा बांगर यांचा जबाब पोलीसांनी घ्यावा आणि आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर आठ दिवसात आरोपींना अटक केली नाही तर कठोर निर्णय घेण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर केज पोलीसांनी बाळा बांगर याला पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्याची तब्बल सहा तास कसून चौकशी केली. तसेच महादेव मुंडे प्रकरणात बांगर याने वाल्मीक कराड व त्याच्या गँगवर केलेल्या आरोपा संदर्भात जबाबही नोंदवून घेतला. (Beed News) बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा 18 महिन्यापूर्वी धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. या खूनातील एकही आरोपी अद्याप पोलीसांच्या हाती लागलेला नाही.

Mahadev Munde Murder Case News Beed
Beed Parli politics : धनंजय मुंडेच्या परळीत जादूटोण्याचा प्रयोग? अजितदादाच्या पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा प्रताप

महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार, अशी धमकी वाल्मीक कराडने आपल्या फोनवरून दिल्याचा दावा बांगर याने केला होता. या पार्श्वभूमीवर केज पोलीसांनी बांगर याची चौकशी करत त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Mahadev Munde Murder Case News Beed
Mahadev Munde Case : अठरा महिन्यानंतरही पतीच्या खूनातील आरोपींना अटक नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आत्मदहनाचा इशारा..

दरम्यान, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवावा अशी मागणी केली होती. बांगर यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती येऊन आरोपींना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस बांगर यांचा जबाब नोंदवून का घेत नाही? असा सवाल करत पोलीसांच्या तपासावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर तातडीने बाळा बांगर याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com