Shivsena UBT News : पक्षाला गळती, मातोश्रीवरून दट्ट्या येताच खैरे-दानवे एकत्र मेळावा घेणार!

Khaire-Danve together to stop the leak in the party : सलग दोन लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची जिल्ह्यात कोरी झालेली पाटी अन् लागलेली गळती नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
Ambadas danve Vs chandrakant khaire
ambadas danve chandrakant khairesarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अडीच वर्षापुर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील सहा पैकी कन्नड वगळता पाच आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले होते. आमदारांनी पक्ष सोडला तरी बहुतांश पदाधिकारी, शिवसैनिक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. परंतु लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या निष्ठावंताच्या निष्ठा डळमळायला लागल्या. एक एक करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, ज्यांनी सत्तेची पद भोगली ते नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊ लागले.

आतापर्यंत सात माजी महापौरांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. महापालिका निवडणुकीच्याआधी आणखी दहा ते बारा नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. पक्षाला भगदाड पडलेले असताना जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही नेते (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे मात्र ही पडझड उघड्या डोळ्यांनी पाहत होते. अखेर मातोश्रीवरून 'तुमचे मतभेद बाजूला ठेवा आणि पक्षाला लागलेली गळती रोखा` असा दट्ट्या आल्यानंतर आता शनिवारी (ता.11) खैरे-दानवे यांनी एकत्र येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा बोलवला आहे.

Ambadas danve Vs chandrakant khaire
Shivsena UBT News : सात माजी महापौरांनी पक्ष सोडला, डझनभर माजी नगरसेवक रांगेत; तरी नेत्यांचा तोरा कायम!

या मेळाव्यातून आगामी महापलिका निवडणुकीची तयारी आणि पक्षासोडून जाणाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची जिल्ह्यात कोरी झालेली पाटी अन् लागलेली गळती नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या पार्श्वभूमीवर खैरे-दानवे यांनी एकत्र येऊन मेळाव्याचे आयोजन हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल.

Ambadas danve Vs chandrakant khaire
Ambadas Danve : तेवीस वर्षाचा पोऱ्या हातावर तुरी देतोयं, सरकार मुंडेंचा राजीनामा घेत नाहीये; किती हा निगरगट्टपणा!

खैरे-दानवे यांच्यातील मतभेदामुळे गेल्या अडीच वर्षात पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकाच पक्षात दोन सत्ता केंद्र निर्माण झाल्याने सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली. यातून काहींनी शिंदेसेनेची वाट धरत मार्ग शोधला, तर अनेकजण 'वेट अॅन्ड वाॅच'च्या भूमिकेत आहेत. अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुख, शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपला कारभार स्वतंत्रपणे आपल्या कार्यालयातून चालवला.

Ambadas danve Vs chandrakant khaire
Chhatrapati Sambhajinagar : खातेवाटप जाहीर होताच मंत्रि‍पदी वर्णी लागलेला शिंदेंचा 'हा' नेता म्हणतो पालकमंत्रीही मीच होणार...

तर चंद्रकांत खैरे यांनी मुंबईप्रमाणे शिवसेना भवनातून संघटनेचे स्वतंत्रपणे काम सुरू ठेवले आहे. दोन्ही नेत्यांकडे हजेरी लावतांना स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांची मात्र कसरत होते. पण दोघांचीही मर्जी सांभाळतांना होणारी कोंडी फोडण्यासाठी आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेचा पर्याय निवडायला सुरूवात केली आहे.

Ambadas danve Vs chandrakant khaire
Uddhav Thackeray Shivsena : ...तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा 'अच्छे दिन' येऊ शकतात!

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकच्या तोंडावर हे परवडणारे नाही, वेळीच याला ब्रेक लावला नाही, तर उमेदवार शोधावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा धोका ओळखूनच मातोश्रीवरून खैरे-दानवे यांना कानपिचक्या दिल्याची माहिती आहे. त्यानंतरच या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत शिवसैनिकांचा मेळावा घेण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com