Kirit Somaiya News : किरीट सोमय्या मूळ 'ट्रॅक'वर ; मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घेतली 'या' व्यक्तीची भेट, मराठवाड्यात खळबळ

Maharashtra Political News : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याविषयी मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama

Chhatrapati SambhajiNagar : किरीट सोमय्या म्हणजे भाजपचे धडाडणारी तोफ आहे. घोटाळ्यांच्या फायली हातात घेऊन विरोधकांच्या पाठिशी केंद्रीय तपासयंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिरा लावण्यातही सोमय्यांचा मोठा हात असल्याचे देखील समोर आले आहे. पण काही दिवसांपूर्वी याच सोमय्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरुन ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी सोमय्यांना कात्रीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला होता.

यानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या त्यांच्या 'मूळ ट्रॅक'वर आले आहेत. मुंबई महापालिकेतील घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर आता सोमय्या अचानक छत्रपती संभाजीनगरला पोहचले आहेत. या दौऱ्यात कुणाची बिंग फुटणार यावरुन तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Kirit Somaiya
Bhavana Gawali News: शिंदे गटात गेलेल्या भावना गवळींना घेरण्यासाठी ठाकरे गटाचा ‘हा’ प्लॅन !

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याविषयी मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती. यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी किरीट सोमय्या औरंगाबादमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी(Bhavana Gawali) यांच्या ईडी चौकशीवेळी उपेंद्र मुळे यांचं नाव चर्चेत आले होते. ते सीए आहेत.

किरीट सोमय्या यांनी सीए उपेंद्र मुळे(Upendra Mule) यांच्या भेटीसाठी आले आहेत. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आपल्याला चुकीचे कागदपत्रे बनवण्याचं सांगितलं होतं, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर भावना गवळींच्या माणसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याच मुळेंची सोमय्यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत.

Kirit Somaiya
India Alliance News: 'इंडिया आघाडी'वर केजरीवाल नाराज? मुंबईतील बैठकीला 'आप' अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा

दरम्यान, सोमय्या यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यासाठी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुळे यांच्या घराबाहेर पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १०० च्या आसपास खाकी वर्दीसह साध्या वेशातले पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी राज्यातील राजकारण तापले होते. सोमय्या यांनी अनेक महिला पदाधिकाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com