Abdul Sattar News : `लाडकी बहीण` आम्हाला पुन्हा सत्तेवर आणेल

Ladaki Bahin Yojana will bring us back to power, believes Abdul Sattar : लाडकी बहीण योजना मेळाव्यांना मिळणारा उत्सफूर्त प्रतिसाद पाहून महायुतीच्या नेत्यांच्या जीवात जीव आला आहे. तब्बल 46 हजार कोटींचा डाव या सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खेळला आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena Political News : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नात `मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना` सर्वात प्रभावी ठरेल असा सत्ताधारी मंत्री, आमदारांना विश्वास आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तर `लाडकी बहीण` आम्हाला पुन्हा सत्तेवर आणणार, आम्ही पुन्हा येऊ असा दावा केला आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये सरकारने जमा केले होते. (Abdul Sattar) या योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जमा होणार आहे. `लाडकी बहीण` येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला तारणार, अशी अपेक्षा महायुतीतील सर्वच घटक पक्षांना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या योजनेचा प्रचार आणि प्रसार राज्यभरात फिरून केला आहे.

लाडकी बहीण योजना मेळाव्यांना मिळणारा उत्सफूर्त प्रतिसाद पाहून महायुतीच्या नेत्यांच्या जीवात जीव आला आहे. तब्बल 46 हजार कोटींचा डाव या सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खेळला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना आणल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी झाली. विरोध केला तर महिला मतदार नाराज होतील, म्हणून योजना निवडणुकीनंतर बंद होईल, आम्ही सत्तेवर आलो तर महिन्याला तीन हजार रुपये देऊ, अशी आश्वासने आघाडीचे नेते देत आहेत.

Abdul Sattar
Ladki Bahin Yojana : आचारसंहितेआधीच महायुतीची मोठी खेळी, लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला पैसे

एकूणच `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना` महायुती सरकारला संजीवनी ठरणार, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे. अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरातील एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजने मुळे आम्ही पुन्हा येऊ, असा दावा करत सत्तेवर आल्यानंतर तुमचे राहिलेले प्रश्नही सोडवू, असे आश्वासन दिले. (Shivsena) अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेसाठी मोठा मेळावा घेतला होता.

यावेळी झालेली गर्दी पाहून मुख्यमंत्री चकित झाले होते. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ आपल्या मतदारसंघातील लोकांना करून देण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असतो. अर्थात याचा त्यांना निवडणुकीत लाभही होतो. लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मतदारसंघातील एकही महिला वंचित राहू नये, यासाठी सत्तार यांनी विशेष यंत्रणा राबवली होती. आता हीच लाडकी बहीण आपल्या पुन्हा आमदार करेल, असा विश्वास सत्तार व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com