Ladki Bahin Yojana : आचारसंहितेआधीच महायुतीची मोठी खेळी, लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला पैसे

Ladki Bahin Yojana 3rd Installment : दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात ज्यांना काही तांत्रिकबाबींमुळे लाभ मिळाला नाही त्या लाभार्थींना देखील लाभ मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही योजना विधानसबेत गेमचेंजर ठरेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. लाडक्या बहि‍णींना योजनेचे दरमहा 1500 रुपये थेट खात्यात मिळत आहेत. पहिले दोन हफ्ते देखील मिळाले आहेत.

पुढील 10 ते 15 दिवसांत आचारसंहिता लागू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे गेमचेंजर ठरणाऱ्या लाडक्या बहिणाच्या योजनेचा तिसरा हफ्ता आचारसंहितेच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, 29 सप्टेंबरला लाडक्या बहिणीचा तिसरा हफ्ता मिळणार आहे. दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलै ऑगस्ट महिन्यात ज्यांना काही तांत्रिकबाबींमुळे लाभ मिळाला नाही त्या लाभार्थींना देखील 29 तारखेला लाडक्या बहिणीचा हफ्ता मिळणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana
Prakash Ambedkar News : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास कायम विरोध; प्रकाश आंबेडकरांचे मोठं विधान

निवडणूक कधी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 ते 15 दिवसांत आचारसंहिता लागू होईल, असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची चर्चा आहे.

Ladki Bahin Yojana
Mahayuti Government: सरपंच, दूधउत्पादक,OBC बाबत मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीतील 'या' आहेत 10 महत्त्वाच्या घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.