Ashok Chavan Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होऊन आता महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. पक्षाने त्यांना 24 तासांत राज्यसभेवर पाठवत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. परंतु अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अजूनही पूर्णपणे स्वीकारले नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. उमरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना 'आता जुनं सगळं विसरा', असे म्हणत मी तुमचाच आहे, मी मोदींची (Narendra Modi) गॅरंटी स्वीकारली आहे. त्यामुळे आता एकत्रितपणे काम करू, असे कळकळीचे आवाहन केले. (Latest Marathi News Update)
कारखाना स्थळ, वाघलवाडा, ता. उमरी, जि. नांदेड (Nanded) येथे तालुक्यातील प्रमुख नेते व उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली उमरी, धर्माबाद, नायगाव तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या वेळी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) हेही व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.
वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये येणाऱ्या उलटसुलट बातम्यांवर विश्वास ठेवू नका. माझे आणि चिखलीकरांचे जमत नाही, आमच्यात अजूनही मतभेद आहेत, अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नका निवडणूक काळात असे प्रकार वाढणार आहेत तेव्हा काळजी घ्या. काँग्रेसमधून (Congress) जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये येत आहेत, त्यांचा विश्वासघात मी कधीही करणार नाही.Ashok Chavan speaking at the workers meeting in Umri
या सगळ्यांचा योग्य सन्मान पक्षात राखला जाईल, त्यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचे काम नाही. जुनं आता सगळं विसरा मी तुमचाच आहे. तुम्ही जसे मोदींचे विचार स्वीकारले तसे मीही स्वीकारले आहेत. पक्षात प्रवेशही केला आहे. त्यामुळे आता काहीही वाद, मतभेद राहिलेले नाहीत. सगळे मिळून एकत्र काम करू आणि जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकास वेगाने घडवून आणू, अशी ग्वाही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली.
मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच सुटू शकेल, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची घेतलेली भेट ही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून किंवा माजी मुख्यमंत्री म्हणून घेतली नव्हती, तर समाजाचा प्रतिनिधी या नात्याने घेतली होती, असे स्पष्ट करत जिल्ह्यात आपल्याला कुठेही मराठा समाजाचा विरोध नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. Ashok Chavan said Forget all the old things now.
भविष्यात संपूर्ण नांदेड जिल्हा हा भाजपमय (BJP) करायचा असून, येणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्याच निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यात दोन गट पडल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच चव्हाण यांच्यासोबत राज्यसभेवर निवड झालेले डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांनी एका कार्यक्रमात 'अशोकराव तुम्ही भाजपत अजगराएवढे मोठे व्हाल, अशी भीती व्यक्त करत भाजप भल्याभल्यांना कळली नाही तुम्हाला अजून बराच वेळ लागेल', असे म्हणत पक्षातील निष्ठावंतांच्या मनातील खदखद बोलून दाखवली होती.
जिल्ह्यात अशोक चव्हाण काँग्रेसमधील आपल्या समर्थकांचे प्रवेश सोहळे घडवून आणत आहेत. यावरूनही जिल्ह्यात दोन गट असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्याबद्दल मनात कुठल्याही प्रकारची शंका किंवा किंतुपरंतु बाळगू नये, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. BJP Party workers meeting in Umri त्यांच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.