Latur DCC Bank : बाबासाहेब पाटलांचे 'असहकार' धोरण, स्वपक्षीयांकडूनही घात; संभाजी पाटील निलंगेकर एकाकी?

Latur politics News : काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अमित, धीरज देशमुख या भावांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निलंगेकर यांच्यावर अचूक निशाना साधल्याचे सध्या चित्र आहे.
Latur DCC Bank Election
Latur DCC Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरून बाभळगावच्या देशमुखांची गढी हादरवून सोडण्याचे भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे स्वप्न अखेर भंग पावताना दिसत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने निलंगेकर यांनी आखलेला प्लाॅन बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेससोबत जात उधळून लावला. विशेष म्हणजे लातूर जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी काँग्रेसने निलंगेकर यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजप नेत्यांसाठीही रेडकार्पेट टाकले. याचे ताजे उदाहरण म्हणजे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदावर बिनविरोध झालेली निवड.

एका आमदाराच्या पत्नीसाठी इतर संचालकांना माघार घेऊन त्यांना बिनविरोध केले. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधु अरविंद पाटील यांचा अर्जच टिकू नये यासाठी थेट कोर्टात धाव घ्यायला लावत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी निलंगेकर विरोधी मोहिम जोरात सुरू केल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अमित, धीरज देशमुख या भावांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निलंगेकर यांच्यावर अचूक निशाना साधल्याचे सध्या चित्र आहे.

संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे काँग्रेसच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत. बाभळगावच्या नादाला लागून त्यांनी आपले मंत्रीपद धोक्यात आणले आहे, असा संताप ते पत्रकार परिषद आणि माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त करत आहेत. एकीकडे लातूर जिल्हा बँकेच्या कारभाराकडे बोट दाखवताना त्याचे पुरावे मतदारांसमोर आणून आपले पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते देशमुख यांनाच तुम्ही निवडणुकीला सामोरे का जात नाहीत? म्हणत आपली उद्विग्नता व्यक्त करत आहेत.

Latur DCC Bank Election
Sambhaji Patil Nilangekar : लातूर जिल्हा बँक देशमुख कुटुंबाचा आत्मा बनलीय : संभाजी पाटील निलंगेकरांचा जिव्हारी लागणारा वार

जिल्हा बँकेच्या राजकारणात संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilngekar) विरुद्ध इतर पक्षाचे नेते असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे. महायुतीमध्ये फूट पडली असून बाबासाहेब पाटील यांनी आपल्या नातेवाईकांची वर्णी लावण्यासाठी तर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसला पूरक अशी घेतलेली भूमिका संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याविरोधात त्रागा करण्याशिवाय निलंगेकर यांच्या हाती आता काहीच उरले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Latur DCC Bank Election
Latur District Bank Election : महायुतीच्या व्यासपीठावर निलंगेकर-पाटील यांच्यात दिलजमाई, तरी धीरज देशमुख म्हणतात, 'बाबासाहेब मनाने आमच्यासोबतच!'

बाबासाहेब पाटील यांच्याविरोधात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची भाषा निलंगेकरांकडून वारंवार केली जात आहे. प्रत्यक्षात अद्याप त्यांनी तसे धाडस केलेले नाही. जिल्हा बँकेचे गेल्या अनेक वर्षापासून कारभारी असलेल्या देशमुख कुटुंबावर संभाजी पाटील यांनी कर्ज वाटपाच्या मुद्यावरून आरोप केले आहेत. बँकेतील हा प्रकार समोर येऊ नये, यासाठीच देशमुखांनी सहकार मंत्री आणि आपल्यातील वादच कसा माध्यमांमध्ये चर्चिला जाईल, असे प्रयत्न चालवल्याचा आरोपही केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.