

लातूरमध्ये खून, दरोडे आणि नशेखोरीचे प्रकार वाढत असल्याने शहराची सुरक्षिततेची प्रतिमा धोक्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चाकू हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आमदार अमित देशमुख यांनी ही घटना गंभीर आणि धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
Latur News : शिक्षणासाठी राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या लातूर पॅटर्ननंतर आता शहरात गुन्हेगारीचा नवा पॅटर्न रुढ होऊ पाहत आहे. गेल्या काही काळात लातूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, दरोडे, नशेखोरीचे प्रकार वाढत असल्याने लातूर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या लातूरमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका तरूणावर चाकू हल्ला करण्यात आला होता. उपचारा दरम्यान या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
आमदार अमित देशमुख हे प्रचारसभा आटोपून बाभळगावकडे परत निघाले असताना आंबेडकर चौकात एका तरुणावर चाकू हल्ला होत असल्याचा थरार त्यांनी स्वतः पाहिला. गाडी थांबवताच हल्लेखोर पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत या तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारा दरम्यानच तो दगावला. या घटनेनंतर लातूर शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार अमित देशमुख यांनी पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून तात्काळ हल्लेखोराच्या अटकेची मागणी केली.
तसेच पोलीस यंत्रणेने याबाबत सजग होऊन अवैध व्यवसायांना प्रतिबंध करावा, गुन्हेगारीला आळा घालावा, शहरात सुरक्षेचे वातावरण निर्माण करावे अशा सूचना त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या. या घटनेवर चिंचा व्यक्त करत अमित देशमुख यांनी चाकू हल्ल्यासारख्या गंभीर घटना धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
काल रात्री लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चाकू हल्ला झालेल्या प्रज्वल संजय मस्के या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मस्के कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत अमित देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रविवारी रात्री जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महापूर येथे आयोजित प्रचार सभा व नागरिकाच्या गाठीभेटी आटपून बाभळगावकडे परतत असताना लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकत, एका तरुणावर चाकू हल्ला होत असल्याचा भयानक थरार निदर्शनास आला. गाडी थांबवताच हल्लेखोर पळून गेले.
या हल्ल्यात जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. जखमी तरुणांवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचनाही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व डॉक्टरांना दिल्या होत्या.
मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाल्याचे दु:खद वृत्त आहे. सदरील घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणेशी संपर्क करून त्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेण्यात आले होते, या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा सूचनाही त्यांना दिल्या असल्याचे अमित देशमुख यांनी सांगीतले.
अलीकडच्या काळात लातूर शहरात दिवसंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी चिंताजनक असल्याचे सांगून पोलीस यंत्रणेने याबाबत सजग होऊन अवैध व्यवसायांना प्रतिबंध करावा, गुन्हेगारीला आळा घालावा, शहरात सुरक्षेचे वातावरण निर्माण करावे, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे अमित देशमुख म्हणाले.
1. लातूरमध्ये गुन्हेगारी का वाढत आहे?
नशेखोरी, टोळक्यांचे वर्चस्व आणि कायदा अंमलबजावणीतील त्रुटी यामुळे गुन्हे वाढत असल्याची चर्चा आहे.
2. चाकू हल्ल्याची घटना कुठे घडली?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर येथे ही घटना घडली.
3. या घटनेत काय नुकसान झाले?
चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
4. आमदार अमित देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली?
ही घटना अतिशय गंभीर आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.
5. लातूरची ओळख कशी बदलत आहे?
शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूरची प्रतिमा आता वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.