

Latur Politics News: भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांचा उत्साह पाहून लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी शंभर टक्के पुसल्या जातील याची खात्री पटली आहे, असे विधान केले. यावरून लातूरसह राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विलासराव देशमुखांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आमदार अमित देशमुख यांनीही रविंद्र चव्हाण यांना सौम्य भाषेत सुनावले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारणाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे.
विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे, अशा शब्दात अमित देशमुख यांनी भाजपवर टीका केली.
लातूर महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी टीका, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, याची मला शंभर टक्के खात्री पटल्याचे विधान केले. यावरून कालपासून काँग्रेस समर्थकांनी सोशल मिडियावर भाजपच्या विरोधात ट्रोलिंग सुरू केले आहे. त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही सावध भूमिका घेत यावर व्यक्त न होता गप्प राहणे पसंत केले.
अमित देशमुख यांनी रविंद्र चव्हाण यांच्या या विधानावर ते दुर्दैवी असल्याचे आणि यातून राजकारणाचा स्तर किती खाली आला आहे, हे लातूर आणि राज्यातील जनता पहात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, रविंद्र चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कालच्या विधानावर स्पष्टीकरण देतांना आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, पण तरीही देशमुख बंधुंचे मन दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.