Congress victory : वाराणसी, नागपूरमध्ये भाजपला धक्के; मोदींच्या मतदारसंघात सपाचा विजय, संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची बाजी!

BJP Setback in Varanasi and Nagpur MLC elections : आजच निकाल लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपला राज्यासह देशात दोन ठिकाणी मोठा धक्का लागला असून संघाच्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय झाला आहे.
BJP Setbacks in Varanasi and Nagpur; Devendra Fadnavis And PM Modi
BJP Setbacks in Varanasi and Nagpur; Devendra Fadnavis And PM ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Varanasi and Nagpur MLC Election Results News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने भाजपला धक्का दिला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला. विधान परिषद निवडणुकीतील या निकालांमुळे भाजपच्या प्रभावक्षेत्रातील राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपुरात भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात चित्र पालटले आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजय खेचून आणला.

नागपूरमध्ये भाजपची आघाडी मोडून वंजारी विजयी

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात पहिल्या फेरीपासूनच अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत कोहळे यांनी आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात विजयाची आशा निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर निकालाचे गणित बदलले.

BJP Setbacks in Varanasi and Nagpur; Devendra Fadnavis And PM Modi
Pune MLC Elections : ‘पेनमध्ये कॅमेरा, खिशात कॅश!’ निवडणुकीत पैसे वाटप? भाजपवर ‘स्पायकॅम पॅटर्न’चा आरोप; सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी

कोहळे यांची सुमारे 4 हजार 700 मतांची आघाडी कमी करत वंजारी यांनी अखेर विजय मिळवला. त्यामुळे भाजपला नागपूरचा पदवीधर मतदारसंघ राखता आला नाही. काँग्रेसने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत नागपूरमधून आपले खाते उघडले.

विशेष म्हणजे, नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा राहिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता सलग दुसऱ्यांदा काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला आहे.

मोदींच्या वाराणसीतही भाजपला धक्का

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातही विधान परिषद निवडणुकीत भाजपला धक्का बसला. वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी भाजपचे प्रमोद मिश्रा यांचा पराभव केला.

लाल बिहारी यादव यांनी सुमारे पाच हजार मतांनी विजय मिळवत शिक्षक मतदारसंघातील आपली जागा राखली. त्यामुळे वाराणसीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. वाराणसी पदवीधर मतदारसंघातही समाजवादी पक्षाचे आशुतोष सिन्हा यांनी भाजपचे केदारनाथ सिंह यांच्याविरोधात सुमारे नऊ हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली होती.

BJP Setbacks in Varanasi and Nagpur; Devendra Fadnavis And PM Modi
Rajya Sabha MLC Elections : राज्यसभेच्या 12 अन् विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी घमासान; भाजपसमोर सर्वात मोठं आव्हान...

भाजपच्या प्रभावक्षेत्रातील निकालांची चर्चा

वाराणसी आणि नागपूर ही दोन ठिकाणे भाजपच्या राजकीय प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व, तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे राजकीय बळ आहे. अशा ठिकाणी विधान परिषद निवडणुकीत भाजपला आव्हान मिळाल्याने या निकालांची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com