Latur DCC Bank Election : सहकार मंत्र्यांना 'ते' महायुतीत असल्याचा विसर पडलाय का? संभाजी पाटील निलंगेकर यांची बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका

Latur DCC Bank Election : लातूर जिल्ह्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आणि राज्याचे सहकार मंत्रीच आमने-सामने आले आहेत.
Latur district cooperative bank | Sambhaji Patil Nilangekar And Babasaheb Patil
Latur district cooperative bank; Sambhaji Patil Nilangekar And Babasaheb Patilsarkarnama
Published on: 
Updated on: 

Latur District Bank Election update : लातूर जिल्ह्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी आग्रही भूमिका घेत भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे.

“काँग्रेसमुळे मी मंत्री झालो,” असे जाहीरपणे म्हणणारे बाबासाहेब पाटील यांना ते महायुती सरकारमधील घटक पक्ष असल्याचा विसर पडला आहे की काय? असा सवाल निलंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. पाणी, चाऱ्याची टंचाई, करपलेली पिके आणि यामुळे हताश झालेला शेतकरी, अशा वातावरणात लातूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक घेणे योग्य नाही.

“ही निवडणूक पुढे ढकलावी,” अशी आमची मागणी आहे. मात्र, सरकारमध्ये आमच्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जिल्हा बँकेची निवडणूक घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यांची भूमिका ही काँग्रेसला पूरक अशी असून, कदाचित ही निवडणूक ते काँग्रेससोबत लढू शकतील, असा थेट आरोपही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.

Latur district cooperative bank | Sambhaji Patil Nilangekar And Babasaheb Patil
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेचे राजकारण पेटले, सहकार मंत्र्यांवर आरोप होताच पुत्र सुरज पाटील मैदानात; संभाजी पाटील निलंगेकरांवर पलटवार!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नको, अशी मागणी करत काही सभासद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले होते. परंतु, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खात्यांतर्गत असलेल्या प्राधिकरणाने निवडणूक घेण्यास आम्ही सज्ज आहोत, अशी भूमिका घेतली. यामागे सहकार मंत्र्यांचा दबाव होता, असा आरोप केला जात आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट सहकार मंत्र्यांचे नाव घेत ते काँग्रेस पक्षाला साथ देत आहेत, असा हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांमुळे आपण सरकारमध्ये मंत्री झालो,” असे बाबासाहेब पाटील जाहीरपणे सांगतात. खरंतर त्यांनी दिवंगत नेते अजित पवार किंवा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार, आमच्या पक्षाचे राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव घेणे अपेक्षित होते. मात्र, ते “काँग्रेसच्या नेत्यांमुळे मी मंत्री झालो,” असे सांगत आहेत.

“राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आपला पक्ष एक घटक पक्ष आहे, याचा विसर कदाचित बाबासाहेब पाटील यांना पडला असावा. काँग्रेसला साथ देण्याची त्यांची भूमिका योग्य नसून, हा प्रकार आपण वरिष्ठांना कळवणार,” असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

Latur district cooperative bank | Sambhaji Patil Nilangekar And Babasaheb Patil
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेवरील निलंगेकरांचे आरोप हवेतच विरले; सहकार मंत्र्यांच्या प्रशस्तीपत्रामुळे भाजप नेत्याची नामुष्की!

एकूणच, लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील घटक पक्षांच्या लातूरमधील दोन नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यावर अद्याप वरिष्ठांनी कुठलेही भाष्य केलेले नसले तरी येत्या काही काळात याचे पडसाद महायुतीच्या स्थानिक राजकारणात निश्चितच दिसतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com