Latur DCC Bank : जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता काबीज केलेल्या देशमुखांना भाजपचा असाही धक्का; निलंगेकरांनी हिसका दाखवलाच...

Latur District Bank Election, Arvind Patil Nilangekar, Latur District Bank Election Result : निलंगा मतदार संघातील देवणी व शिरूर अनंतपाळ या दोन तालुक्यातही भाजपाच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने सहकारातील निवडणूकीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसून आले.
Arvind Patil Nilangekar
Arvind Patil NilangekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

राम काळगे

BJP Congress Politics : लातूर महापालिकेच्या २०१७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 'झिरो टू हिरो' होण्याची किमया साधली होती. भाजपने २१ एप्रिल २०१७ रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महापालिकेवर पहिल्यांदाच सत्ता मिळवली. या विजयाचे शिल्पकार तत्कालीन मंत्री आणि जिल्ह्याचे संभाजी पाटील निलंगेकर हे ठरले होते.

आता लातूर जिल्हा बँकेत त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी झिरो ते पाच संचालक निवडून आणण्यात यश मिळवले आहे. सत्ता परिवर्तन करता आले नसले तरी निलंगा तालुका भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे तीनही संचालक निवडून आणत निलंगेकरांनी दाखवून दिले.

निलंगा विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील सहकारी संस्थामध्ये प्राबल्य असलेल्या काँग्रेस पक्षाला जिल्हा बँक निवडणूकीच्या माध्यमातून एक प्रकारे भाजपाने परिवर्तन पॅनलच्या तिन्ही जागा जिंकून सुरुंग लावला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांना 64 मते तर त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांना 32 मते मिळाली. निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशा झालेल्या लढतीत 32 मतांनी अरविंद पाटील यांचा विजय बँकेतील दमदार एन्ट्री ठरला आहे.

Arvind Patil Nilangekar
Ajit Pawar Plane Crash : CM फडणवीसांनी शहांसमोर काढला अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा; सुनेत्रा पवार, शिंदेसमोरच मनातलं सांगितलं...

देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यात भाजपाची सरशी झाल्याने निलंग्यात भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ही निवडणूक देशमुख विरुद्ध निलंगेकर अशी प्रतिष्ठेची झाली होती. शिवाय निलंगा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी ३२ मतांनी विजय मिळविला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या संगीताताई पाटील निलंगेकर यांचा त्यांनी पराभव केला.

Arvind Patil Nilangekar
Congress MP News : काँग्रेस खासदाराकडून विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा; कारवाईसाठी भाजपने लावलीय ताकद...

विशेष म्हणजे, अरविंद पाटील यांची ही पहिलीच निवडणूक होती. जिल्हा बँकेच्या राजकारणात पदार्पणातच मिळविलेल्या विजयामुळे याची जिल्ह्यात चर्चा होत आहे. देशमुखशाहीतून जिल्हा बँक मुक्त झाली, असा दावा या विजयानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी केला आहे. निलंगा तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या मतदारसंघांतील निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यातही सर्वाधिक ९९ मतदार असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील अरविंद पाटील निलंगेकर व संगीताताई पाटील निलंगेकर यांच्यातील थेट लढत चर्चेचा विषय ठरली होती.

निलंगा मतदार संघातील देवणी व शिरूर अनंतपाळ या दोन तालुक्यातही भाजपाच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने सहकारातील निवडणूकीत मोठे परिवर्तन झाल्याचे दिसून आले. या तिन्ही तालुक्यात सहकारातील संस्था बहुतांश काँग्रेसच्या ताब्यात असताना मिळालेले यश मोठे मानले जात आहे. यापूर्वी अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंगा व ओरादशहाजानी बाजार समिती निवडणूकीतही एकहाती विजय मिळवून नवख्या कार्यकर्त्यांना संधी दिली होती. दोन्ही बाजार समित्या भाजपाच्या ताब्यात होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.