Ajit Pawar Plane Crash : CM फडणवीसांनी शहांसमोर काढला अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा; सुनेत्रा पवार, शिंदेसमोरच मनातलं सांगितलं...

Ajit Pawar Death, Devendra Fadnavis, Amit Shah, Sunetra Pawar, Eknath Shinde : सामान्यातल्या सामान्य माणसाला असं वाटतंय की, जे काही घडलंय ते नेमकं काय आहे? हा अपघात आहे की याच्यापाठीमागं काही घडलंय? याची स्पष्टता याव, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
The statue of Ajit Pawar was unveiled by Union Home Minister Amit Shah at the Pune Zilla Parishad on Monday. Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Sunetra Pawar were present on the occasion.
The statue of Ajit Pawar was unveiled by Union Home Minister Amit Shah at the Pune Zilla Parishad on Monday. Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Sunetra Pawar were present on the occasion.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुणे जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या विमान अपघातावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. यावेळी स्टेजवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. या दुर्घटनेनंतर अपघातावरून अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. नुकतेच शिवसेना नेते रामदास कदम यांनी विमान अपघाताच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंविषयी वादग्रस्त विधान केले होते.

राज्यात सातत्याने अपघाताबाबत साशंकता उपस्थित होत असतानाच सोमवारी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच हा मुद्दा काढला. ते म्हणाले, अजितदादांच्या जाण्याचा चटका सगळ्यांच्या मनाला लागला आहे. पण त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांच्या मनात काही प्रश्नही निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या पध्दतीने चर्चा झाल्यात.

The statue of Ajit Pawar was unveiled by Union Home Minister Amit Shah at the Pune Zilla Parishad on Monday. Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Sunetra Pawar were present on the occasion.
Supreme Court news : ZP, पंचायत समित्यांसाठी महत्वाची बातमी; मतदारसंघ आरक्षणाच्या रोटेशनवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब, सरकारला दिलासा

सामान्यातल्या सामान्य माणसाला असं वाटतंय की, जे काही घडलंय ते नेमकं काय आहे? हा अपघात आहे की याच्यापाठीमागं काही घडलंय? याची स्पष्टता यावी. यासंदर्भातील खरी माहिती आम्हाला मिळावी. अशाप्रकारची एक बाब सातत्याने चर्चिली जाते, असे सांगत मुख्यमंत्र्‍यांनी आज गृहमंत्र्यांना याबाबतचा चौकशी अहवाल लवकरात लवकर आला पाहिजे, अशी विनंती केल्याचे स्पष्ट केले.

The statue of Ajit Pawar was unveiled by Union Home Minister Amit Shah at the Pune Zilla Parishad on Monday. Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Sunetra Pawar were present on the occasion.
Congress MP News : काँग्रेस खासदाराकडून विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा; कारवाईसाठी भाजपने लावलीय ताकद...

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज गृहमंत्र्यांना मी सकाळी देखील विनंती केली की, अपघाताला जवळपास दहा महिने होतोयेत. एक मोठी चौकशी सुरू आहे. अमेरिकेचे, वेगवेगळ्या राष्ट्रांचे लोकंही चौकशी करत आहेत. त्यांच्या टीमही मदत करत आहेत. पण कुठंतरी महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मनातलं संभ्रम दूर झाला पाहिजे. अहवाल लवकरात लवकर आला पाहिजे. कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आलं पाहिजे. आणि समजा यामध्ये हा जर अपघात असेल तर किमान सामान्य माणसाच्या मनातील आक्रोशावर फुंकर पडली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.