Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची अपडेट; अर्ज बाद झालेल्या 13 उमेदवारांना दुसरा मोठा धक्का

DCC Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यात छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी उमेदवारी अर्ज बाद केलेल्या तेरा उमेदवारांनी येथील विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे अपिल केले होते.
Latur DCC Bank Election
Latur DCC Bank ElectionSarakrnama
Published on: 
Updated on: 

Marathwada News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद ठरवल्याने तेरा उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपिल दाखल केले होते. या तेराही उमेदवारांच्या अपिलावर सुनावणी घेवून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत सर्वांचे अपिल फेटाळण्यात आले आहेत. हे सर्व उमेदवार आता या निर्णयाच्या विरोधात उच्चा न्यायालयातच धाव घेण्याच्या तयारीत आहेत.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यात छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी उमेदवारी अर्ज बाद केलेल्या तेरा उमेदवारांनी येथील विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे अपिल केले होते. गेल्या काही दिवसापासून या अपिलावर सुनावणी सुरु होती. यात आता या तेराही उमेदवारांच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत अपिल फेटाळण्यात आले आहेत.

अर्ज छाननीच्या वेळी संस्था थकबाकीदार असल्याने चाकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदार संघातील गोविंद माकणे, संस्थेवर संचालक नसल्याने अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व महिला प्रतिनिधी मतदारसंघातील अबोली विनायक पाटील, संस्था थकबाकीदार व अनुभव नसल्याने महिला प्रतिनिधी मतदारसंघातील मनोरमा पाटील, संस्थेवर संचालक नसल्याने उदगीर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातील सोनाली प्रमोद पाटील यांचा अपील फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे.

तसेच संस्था थकबाकीदार असल्याने जळकोट मतदारसंघातील धर्मपाल देवशेट्टे, बँकेचे थकबाकीदार असल्याने हाऊसिंग मतदारसंघातील सतीश शेषेराव जाधव, जिल्हा बँकेच्या खात्यावर संस्थेचा व्यवहार नसल्याने प्रक्रिया मतदारसंघ व इतर मागासवर्गीय मतदारसंघातील भरत चामले, लेखा परिक्षणाची वर्गवारी नसल्याने पतसंस्था मतदारसंघातील भिमाशंकर राचट्टे, हार्वेस्टरचे कर्ज थकीत आहे.

Latur DCC Bank Election
मोठी बातमी : 2029 साठी भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर : खुद्द अमित शाहंनीच केली घोषणा

निलंगा मतदारसंघातील वामनराव पाटील, लेखा परिक्षण वर्गवारी नसल्याने प्रक्रिया मतदारसंघातील सचिन सुभाष पाटील, मतदार यादीत सभासद नसल्याने अनुसूचित जाती मतदारसंघातील राणी शिवलीकर यांचा उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला होता. या सर्वांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपिल दाखल केले होते. ते आता फेटाळण्यात आले आहे.

प्रत काढण्याची घाई

विभागीय सहनिबंधकांनी अपील फेटाळल्याने या उमेदवारांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निकालाच्या प्रत काढण्य़ासाठी उमेदवारांची व त्यांच्या वकिलांची धावपळ सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.