Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीसाठी अपहरण, धमक्याही; एका उमेदवारासह दहा जणांवर गुन्हा!

Bank election controversy News : रेणापूर तालुक्यातून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे कार्यकर्ते रवी धनराज जाधव यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur DCC Bank Election
Latur DCC Bank ElectionSarakrnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचे अपहरण करून त्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, ठार मारण्याची धमकी दिली या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात या निवडणुकीतील एका उमेदवाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या निवडणुकीत रेणापूर तालुक्यातून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे कार्यकर्ते रवी धनराज जाधव यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत, ‘उमेदवारी दाखल केल्यापासून याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे व शरद कदम हे आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात सातत्याने दबाव टाकत होते. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाला विशालनगर येथे असताना शरद कदम यांनी मला दयानंद गेटला बोलावून घेतले. तेथून त्यांनी एका कारमध्ये बसवून एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये नेले.

तेथे या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे व काही व्यक्ती अगोदरच उपस्थित होत्या. त्यानंतर पैसे घे, उमदेवारी मागे घे अन्यथा कुटुंबीयाला जीवंत ठेवणार नाही’, अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून दबाव आणला जात असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू होत्या.

Latur DCC Bank Election
Bjp News : चुकीला माफी नाही…!फुलफिल प्लॅनिंग फसलं, नेमकं पाणी कुठं मुरलं..? भाजपच्या नगरसेवकांसह आमदारांचीही होणार झाडाझडती, दिल्ली दरबारी प्रकरण पोहोचणार

आता प्रत्यक्षात तसा आरोप करत एका उमेदवाराने थेट पोलीसांत धाव घेतली आहे. रेणापूर तालुका सेवा सोसायटीचे उमेदवार रवी जाधव यांनी हा आरोप केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आणखी नेमका काय प्रकार घडला? याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे.

Latur DCC Bank Election
NCP Alliance News: ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला तूर्त पूर्णविराम! सुनेत्रा पवारांचे स्थान, पक्षावरचा कंट्रोल अन् मंत्रिपदाच्या वाटपावर अडली बोलणी

या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारासह भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले होते. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत अधिकाधिक संचालक हे बिनविरोध व्हावेत यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा बँक आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात राहावी यासाठी अनेक राजकीय तडजोडी आणि घडामोडी जिल्ह्यात घडत आहेत.

Latur DCC Bank Election
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत सहकाराचा वेगळाच पॅटर्न; देशमुख-पवार एकत्र, भाजप आमदारांच्या सौभाग्यवतीही बिनविरोध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.