

Jawahar Navodaya Vidyalaya Latur : लातूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणारी अनुष्का पाटोळे विद्यार्थिनी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्याचे अवस्थेत ती आढळली. हा अपघात आहे की घात, अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार झाला आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
दरम्यान, अनुष्काच्या आईसह नातेवाइकांनी विद्यालयात गर्दी केली होती. नेमका हा प्रकार कशातून झाला, याची विचारणा ते विद्यालयातील प्रशासकीय व्यवस्थेकडे केली जात होती. पण विद्यालयाच्या प्रशासनाकडून कोणतेच उत्तर मिळत नव्हते. अनुष्काच्या आईचा आक्रोशाने विद्यालय परिसर हादरला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यालय परिसरात बंदोबस्त वाढवला होता.
अनुष्का अभ्यासात हुशार आणि सर्वाच चुणचुणीत विद्यार्थिनी (School Student) होती, असे सांगितले जाते. तिचे वडील औसा तालुक्यातील टाका गावातील रहिवासी असून ते मोलमजुरी करतात. अभ्यासाच्या ताणातून अनुष्काने जीवन संपवले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण विद्यालय प्रशासनाकडून नेमका खुलासा होत नसल्याने संभ्रम वाढला आहे.
अनुष्काच्या नातेवाइकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताचा आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला संशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनुष्काच्या आईला सकाळी लातूरच्या (Latur) विद्यालयातून फोन आला की, तुम्ही शाळेत तातडीने या. नंतर फोन आला की जिल्हा रुग्णालयात या. यावर अनुष्काच्या आईने विद्यालयातील मॅडमला फोन लावून विचारले की नेमकं काय झालं आहे, तर मन घाबरवणारी उत्तर मिळाली. यानंतर अनुष्काच्या आईवडिलांसह नातेवाइकांनी शाळेकडे धाव घेतली.
दरम्यान, विद्यालयाच्या वसतिगृहात लातूर एमआयडीसी पोलिस दखल झाले होते. पंचनामा सुरू केला होता. उत्तरीय तपासणीसाठी अनुष्काचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. ही घटना अपघात आहे की घात, याचा पोलिस चौहू बाजूने तपास करत आहेत.
पोलिसांनी प्राथमिक तपासात वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे चौकशी केली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनुष्काच्या आजी-आजोबा, आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. वैद्यकीय महाविद्यालयात दिवसभर या प्रकरणाची चर्चा होती.
लातूर शहरालगत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे पालक जमा झाले होते. काही पालकांनी विद्यालयात विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा आरोप केला. विद्यालयातील वातावरण पूर्वीसारखे नाही, विद्यार्थी मानसिक तणावात राहातात, असा काही पालकांनी दावा केला. शांतता-सुव्यवस्थेसाठी विद्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.