Latur Loksabha Constituency : साडेचार वर्षे झाली, कुणाला लातूरचे भाजप खासदार आठवतात का?

BJP Latur MP Sudhakar Shrangare : मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले सुधाकर श्रृंगारे मतदारसंघावर ठसा उमटवण्यास अपयशी झाल्याची टीका.
Sudhakar Shrangare
Sudhakar ShrangareSarkarnama
Published on
Updated on

Latur News : सध्या लातूरमध्ये चर्चा सुरू आहे ती न दिसणाऱ्या खासदारांची. भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shrangare) यांना साडेचार वर्षांत कुणी पाहिले आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

आतापर्यंत झालेल्या म्हणजेच 1962 पासून लातूर लोकसभा मतदारसंघावर (Latur Loksabha Constituency) काँग्रेसचे वर्चस्व राहिले. तुळशीराम कांबळे, शिवराज पाटील-चाकूरकर, जयंत आवळे या खासदारांमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत राहिला. शिवराज पाटील-चाकूरकर यांनी तर सलग सातवेळा निवडून येण्याचा विक्रम या मतदारसंघातून केला. त्यानंतर 2004 मध्ये रुपाताई पाटील-निलंगेकर यांच्या रुपाने पहिल्यांदा या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला.

Sudhakar Shrangare
Anganwadi Sevika Protest : '...तोपर्यंत भाजपला मतदान करणार नाही!'; ठाकरेंसमोरच अंगणवाडी सेविका गरजल्या

2009 मध्ये (दिवंगत) विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा ही जागा जिंकली. जयंत आवळे यांनी भाजपच्या सुनील गायकवाड यांचा पराभव केला होता. त्यानंतर सलग दोन टर्म भाजपने ही जागा जिंकत आपली पकड मजबुत केली. एकदा सुनील गायकवाड तर गेल्या लोकसभा निवडणुकीत फारसे चर्चेत नसलेले सुधाकर श्रृंगारे हे तब्बल 2 लाख 90 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला.

एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shrangare) यांची विजयानंतर आता त्यांच्या खासदारकीची साडेचार वर्ष उलटून गेली तरी चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील लातूर हा एकमेव असा मतदारसंघ असेल की ज्याचा खासदार कोण? त्यांचे नाव काय? हे आठवावे लागते ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक ताकदीच्या जोरावर उमेदवारी अन् विजय मिळवलेल्या श्रृंगारे यांना 2024 मध्ये भाजप पुन्हा उमेदवारी देणार? की मग दुसऱ्याला संधी देणार हे पहावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारीसाठी किती इच्छुक?

गेल्या साडेचार वर्षांत श्रृंगारे हे सार्वजनिक कार्यक्रम, पक्षाचे मेळावे, बैठका, दिल्लीत किंवा सभागृहातही कधी फारसे दिसले नाही. त्यामुळे ते स्वतः पुन्हा उमेदवारी मिळवण्यास इच्छुक आहेत की नाही हेही अद्याप स्पष्ट नाही. गेल्यावेळी माजीमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी श्रृंगारे यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या विजयात निलंगेकर यांची महत्त्वाची भूमिका होती. परंतु साडेचार वर्षांत सुधाकर श्रृंगारे यांची खासदार म्हणून जिल्ह्यावर फारशी छाप उमटवली नाही.

मतदारांशी नाळ?

मतदारसंघाशी त्यांचा संपर्क किती, हाही वादाचा मुद्दा ठरू शकतो. काँग्रेसकडून भाजपने खेचून आणलेला लातूरचा मतदारसंघ कायम चर्चेत असायचा, पण साडेचार वर्षांत मात्र या मतदारसंघाची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. राज्यात 'मिशन 45'चे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली भाजप लातूरमध्ये श्रृंगारे यांना पर्याय शोधणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत संभाजी पाटील-निलंगेकर यांचेही नाव असल्याची चर्चा आहे.

(Edited by Avinash Chandane)

Sudhakar Shrangare
Dharashiv Shivsena News : धाराशिवचा खासदार शिवसेनेचाच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटाचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com