Dharashiv Shivsena News : धाराशिवचा खासदार शिवसेनेचाच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटाचा दावा

CM Eknath Shinde Dharashiv Daura : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा महत्त्वाचा समजला जातो.
Dharashiv Shivsena
Dharashiv ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात मराठवाडा दौरा आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा समजला जातो. यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटात आलेली मरगळही झटकली जाणार आहे. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री 10 जानेवारीला येणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून शिंदे सेनेमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हा उत्साह इतका दांडगा आहे, की शिंदेंच्या दौऱ्याआधाची धाराशिवचा खासदार शिवसेनेचाच होणार, असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये पक्षाचा मेळावा होणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात ते शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, बूथप्रमुख, गणप्रमुख व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बुधवारी (दि. 3) जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dharashiv Shivsena
Hingoli Loksabha News : काँग्रेसला हवी हिंगोली; त्यासाठी जालन्यावर पाणी सोडण्याची तयारी ?

शिवसेनेचे सचिव तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, शिवसेनानेते तथा मराठवाडा विभागप्रमुख आनंद जाधव, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, माजी खासदार लोकसभा संपर्कप्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांनी आपण धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले.

युवासेनेचे नितीन लांडगे यांनी पालकमंत्री सावंतसाहेबांनी आशीर्वाद दिला आणि धाराशिव लोकसभेत आमदारकीला पडलेला उमेदवार खासदार झाला. यावेळेस शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील तो निवडून देण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे सांगितले. धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही राहणार, असा विश्वास माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा महायुती जो उमेदवार देईल, त्यांस निवडून आणायचे असल्याचे ते म्हणाले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघावर यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले असून यापुढेही शिवसेनेचाच खासदार राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय, विकासाच्या प्रभावी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पोहचवाव्यात, असे आवाहन मोरे यांनी उपस्थितांना केले. येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला शंभर टक्के यश मिळणार आहेच, परंतु ते घवघवीत यश असायला हवे, यासाठी सर्वांची जबाबदारी वाढली असल्याचेही ते म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

Dharashiv Shivsena
Banks loss News : राज्यभरातील 29 बँका अडचणीत, 511 कोटींचा तोटा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com