

Ladki Bahin Yojana 30 Lakh Women to Miss Benefit from April 2026: योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते आणि DBT तपासणी यांच्या आधारे पात्रतेची छाननी केली जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी करण्याची मुदत संपली आहे. राज्यातील तीस लाख महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या प्रक्रियेला मुदत वाढ न मिळाल्याने या महिलांचा लाभ आता बंद होणार आहे.
1 एप्रिलपासून आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. आता आयकर विभागाकडून पात्र महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अपात्र महिलेचे धाबे दणाणले आहे. ईकेवायसीच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबाची आर्थिक पडताळणी करण्यात येणार आहे. नव्या आर्थिक वर्षांपासून केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारची महिलांसाठीची असलेली महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ आता अधिक काटेकोरपणे राबवली जाणार आहे. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की १ एप्रिलपासून फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते आणि DBT तपासणी यांच्या आधारे पात्रतेची छाननी केली जात आहे. ज्या महिलांची माहिती अपूर्ण आहे किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.
राज्य सरकारने 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगितले होते. तेव्हा दीड कोटी महिलांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर राज्यात आलेल्या पुरस्थितीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.