Shiv Sena UBT Politics : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने, भाजपात गेलेल्या विनायक पांडेंचा पंचनामाच केला!

Shiv Sena UBT politics latest news : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी आमदाराने भाजपात प्रवेश केलेल्या विनायक पांडेंवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले.
Vasant Gite
Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

Vasant Geete News: महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत अनेकांनी पक्षांतर केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे यांचे पक्षांतर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पांडे यांच्यावर आरोप होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार जोरात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विविध नेते सध्या प्रचारात सहभागी होत आहेत. माजी आमदार वसंत गीते यांनी शहरातील प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

माजी आमदार गीते यांचे निकटवर्तीय म्हणून माजी महापौर विनायक पांडे यांचे नाव चर्चेत होते. उमेदवारीच्या वादातून पांडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपला जवळ केले. त्यांचे हे पक्षांतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये वादाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर विनायक पांडे यांच्या बालेकिल्ल्यात माजी आमदार गीते यांची सभा झाली.

Vasant Gite
Nashik NMC Election: रामदास आठवले समर्थक प्रकाश लोंढे जेलमधून दोन तास बाहेर; कार्यकर्त्यांना म्हणाले...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिक मधील जनता सुज्ञ असून ते गद्दार उमेदवारांना थारा देणार नाहीत, असे गीते म्हणाले. माजी महापौर विनायक पांडे यांचा उल्लेख माजी आमदार गीते यांनी "कपाळ करंटे"असा केला. पांडे हे प्रत्येकाकडून पैसे वसुली करत होते.

पक्षाने त्यांना महापौर केले. नगरसेवक केले. मात्र त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. विधानसभा निवडणुकीत पांडे यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. त्यांना अनेक अडचणीत कुटुंब म्हणून मी मदत केली. मात्र विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात पांडे यांनी काम केल्याचा आरोप, गीते यांनी केला.

Vasant Gite
Eknath Shinde Politics : भाजपच्या 'मिशन लोटस'ला एकनाथ शिंदेंचा चकवा; काँग्रेसचे निलंबित नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

माजी आमदार गीते यांनी पांडे यांना टार्गेट केले. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणूक प्रचार आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याने पांडे त्याला काय उत्तर देतात, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com