Latur Political News : महायुतीच्या मेळाव्यात आमदार देशमुख बंधू टार्गेट

Loksabha Election 2024 : गेल्‍या दहा वर्षांत देशहितासाठी आणि देशभरातील जनतेच्‍या विकासासाठी केलेल्‍या कामामुळे ‘चारशे पार’ हा जनतेचा आवाज झाला आहे.
Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh News
Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh NewsSarkarnama

Latur News : लातूर लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीच्‍या प्रचारार्थ लातूर येथे आयोजित मेळाव्यात महायुतीच्या बहुतांश नेत्यांनी आमदार अमित देशमुख व धीरज देशमुख यांना टार्गेट केले.

शिवसेना (शिंदे गटाचे) संपर्कप्रमुख बळवंत जाधव यांनी तर लातूरच्या देशमुखशाहीचे समूळ उच्चाटन करा, असे थेट आवाहनच केले. जाधव म्हणाले, कांँग्रेसशाही धोक्यात नाही तर देशमुखशाही धोक्यात आहे. देशमुखशाहीने लिंगायतांचा छळ केला, असा थेट आरोप करुन देशमुख शाहीचे समूळ उच्चाटन करा, असे थेट आवाहनच त्यांनी केले.

Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh News
Pratap Shilimkar News : प्रताप शिळीमकर करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंना वेल्हे तालुक्यातून धक्का!

भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मंगळवारी (ता.१६) लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा (BJP) महायुतीच्‍या प्रचारार्थ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप व मित्रपक्ष महायुतीचा मेळावा झाला.

यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंंत्री संजय बनसोडे ,खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर ,गोविंद केंद्रे , बब्रुवान खंदाडे, अर्चना पाटील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चारशे पार भाजपाचा नव्‍हे, देशातील जनतेचा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला महासत्‍तेकडे घेवून जाण्‍याचे काम करीत आहेत. गेल्‍या दहा वर्षांत देशहितासाठी आणि देशभरातील जनतेच्‍या विकासासाठी केलेल्‍या कामामुळे ‘चारशे पार’ हा जनतेचा आवाज झाला आहे. चारशे पार भाजपाचा नव्‍हे तर जनतेचा नारा असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून प्रस्थापीत्ताविरुद्ध आपला लढा आहे. त्यामुळे गाफील राहू नका. लातूर ग्रामीणमधून मताधिक्‍य मिळावे यासाठी महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रचारयंत्रणा गतिमान करावी, असे आवाहन राज्‍याचे युवक कल्‍याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्‍या माध्‍यमातून गेल्‍या 15 दिवसांत पावसाळयातील छत्रीप्रमाणे कॉग्रेस गावांगावात दिसत आहे. हे लोक पाच वर्षे कुठे होते असा प्रश्‍न उपस्थित करुन आमदार रमेश कराड म्‍हणाले, गरीबी हटावचा नारा देवून सर्वाधिक काळ सत्‍ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने गरीबांची गरीबी हटवली नाही. मात्र, पुढाऱ्यांच्‍या परिवाराचे हित साधले.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गोरगरीब माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरु केल्‍या. त्‍याचा प्रत्‍यक्ष लाभ दिला. लातूर ग्रामीण मतदारसंघात गेल्‍या 15 वर्षांपासून काँग्रेसचा आमदार आहे. त्‍यांनी 15 वर्षांत केलेल्‍या कामापेक्षा आमदार म्‍हणून मी 3 वर्षांत केलेली कामे कितीतरी पटीने अधिक आहेत.

साखर कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून राजकारण करणाऱ्या सहकारमहर्षी यांनी यावर्षी शेतक-यांचा ऊस वाळविण्‍याचे पाप केले. मागील वर्षाचे अनेक शेतकऱ्यांचे अद्याप ऊस बिले दिले नाही याची आठवण करुन दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh News
Shahu Maharaj News : शाहू महाराजांच्या पोस्टरवरून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोच गायब! शिंदे गटाने डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com