Lawrence Bishnoi gang : बिश्नोई गँगच्या 'कॉन्ट्रॅक्ट किलर'च्या अटकेचा थरार; 'स्लिपरसेल' म्हणून कार्यरत...

Contract Killer from Lawrence Bishnoi Gang Arrested in Yavatmal SP Kumar Chintha : लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दोन वर्षांपासून यवतमाळ शहरात ओळख लपवून राहत होता.
Lawrence Bishnoi gang
Lawrence Bishnoi gangSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra gang crime : लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दोन वर्षांपासून ओळख लपवून यवतमाळ शहरातील दांडेकर ले-आऊट इथं राहत होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला शुक्रवारी (ता.30) अटक केली. त्याच्या शिरावर पंजाब तसेच राजस्थान राज्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अ‍ॅक्ट असे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.

भूपेंद्र सिंग ऊर्फ रघू ऊर्फ भिंडा (वय 35, रा. ग्राम अहारना खुर्द, होशियारपूर, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या गँगस्टरचे नाव आहे. पोलिस (Police) अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब खून प्रकरणातील फरार आरोपी दांडेकर ले-आऊटमध्ये एका भाड्याच्या घरात नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली.

घराभोवती घेराव घातल्यानंतर भूपेंद्र सिंगला पोलिसांची चाहूल लागली. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले, त्याची चौकशी केली असता त्याने खरी ओळख सांगितली. 2023 मध्ये बाडनेर (पंजाब) येथील हरपालसिंग ऊर्फ रिंकू यांचा खून केला होता. त्या प्रकरणात भूपेंद्र सिंग फरार होता. यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात 20 वर्ष तसेच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात (Crime) दहा वर्ष, अशी शिक्षा झालेली आहे. दोन्ही प्रकरणात तो फरार होता.

Lawrence Bishnoi gang
Dipankar Bhattacharya : मोदी सरकार अदानी-अंबानींसारख्या काही धनिकांच्या सेवेत; दीपांकर भट्टाचार्य यांचा घणाघात

गेल्या दोन वर्षांपासून तो यवतमाळात वास्तव्यास होता. धाबा व्यावसायिक म्हणून तो यवतमाळात लपून होता. कुख्यात गँगस्टरला पोलिसांनी अटक केल्यानंतर राजस्थान तसेच पंजाब पोलिसांना माहिती देण्यात आली. भूपेंद्र सिंग भिंडा जरनैल सिंग उर्फ रघुवर ऊर्फ रघू याला ताब्यात घेण्यासाठी राजस्थान पोलिस यवतमाळात आले आहे.

Lawrence Bishnoi gang
Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती; राष्ट्रपती, पंतप्रधान आले नाही, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, विनोद राठोड, नीलेश राठोड, आकाश सहारे, ममता देवतळे यांनी पार पाडली.

अमेरिकेतून फंडिंग

लॉरेन्स बिश्नोई तसेच गुज्जर गँग ही गुन्हेगारी जगतात नावाजलेली गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी घडविण्यासाठी गँगस्टारना वाहने, शस्त्रे पुरवून गुन्हे घडविणे आदी गुन्हे याच्यावर दाखल आहेत. घटनेनंतर फरार झाल्यानंतर ओळख लपवून राहण्यासाठी महिन्याला 20 ते 25 हजार रुपयांची रक्कम पुरविली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही मदत अमेरिकेतून सौरव गुज्जर (गँगस्टर बिल्लू गुज्जरचा भाऊ) हा याला डॉलरमध्ये मनी ट्रान्सफरच्या मदतीने तीन वर्षांपासून पैसे पाठवीत असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com