
Solapur, 07 September : अजितदादा, तुम्ही अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर वरिष्ठ सभागृहात पाठवला आहे. त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. त्या अमोल मिटकरीमुळे तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार आहात. अजितदादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळं करायला लावणार. तुम्ही या पाळलेल्या श्वानाला आवरा, अशी घाणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्यावर केली.
बीडच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
हाके म्हणाले, अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य केले आहे. यूपीएससीचा लॉंग फॉर्म तरी त्याला माहिती आहे का? अमोल मिटकरी हा कोणत्यातरी समाजाला टार्गेट करतो हा नकलाकार आहे.
अजितदादांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. तसेच, शरद पवार यांचाही वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे तुम्हाला शोभत नाही, अजितदादांनी आपली भाषा सुधारावी. जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन नका, असेही हाके यांनी स्पष्ट केले.
अजित पवार, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर वगैरे कळणार नाहीत. तुमची ती कुवत किंवा लायकीही नाही. तुम्हाला कारखाना चालविण्याशिवाय दुसरं काय जमतं? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला.
हाके म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर हा माझा सहकारी असून अठरापगड जातीचा आवाज आहे. गोपीचंद पडळकर मंत्रिपद, आमदारकी, पक्षाचा आदेश जाऊ द्या. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श असले पाहिजेत. आमदार, खासदार आपण बनवू आणि सत्तेत कोणाला बसवायचे ते ठरवू.
कुठल्यातरी, काहीतरी गोष्टीसाठी आपला आवाज दाबू नका, व्यक्त व्हा. बोला. माझा सहकारी बोलायला लागला की आम्ही गावगाड्यातील ओबीसींचा आवाज बनू. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहगिरी नाही. हा महाराष्ट्र ओबीसी अठरा पगड जाती, भटके विमुक्त यांचा आहे, हे दाखवून द्या, असे आवाहनही हाके यांनी पडळकर यांना केले.
हाके म्हणाले, गोपीचंद पडळकर आपण अल्पसंख्याक आहोत का? आपण 50 टक्के आहोत. सरकार दहा टक्केवाल्याला एवढं घाबरत असेल, तर आपल्याकडे 50 ते 60 टक्के आहेत. गोपीचंदाला एकच सांगेन, सगळं फेकून द्या. शोषण बास झालं. इथले सरकार, आमदार, खासदार यांना पळता भुई थोडी करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.