Lingayat Reservation News : आरक्षणासाठी आता लिंगायत समाजही रान पेटविणार...

Lingayat community : आरक्षणप्रश्नी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आक्रमक झाली आहे.
Latur Collector Office
Latur Collector OfficeSarkarnama
Published on
Updated on

Latur News : मराठा, धनगर समाजानंतर आता वीरशैव लिंगायत समाजातील हिंदू लिंगायतसह उर्वरित पोटजातींनाही ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आक्रमक झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत समाजाची ताकद दाखविण्याचा निर्धार समाजाकडून करण्यात आला आहे. (Lingayat community march to Latur Collectorate on Monday for reservation)

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाजाने आक्रमकपणे आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाप्रमाणे आक्रमक झालेल्या धनगर समाजानेही चौंडी येथे आंदोलन करीत आरक्षणप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Latur Collector Office
Karnataka Politics : ‘५० कोटी अन्‌ मंत्रिपद...भाजपची कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना ऑफर’

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली वीरशैव लिंगायत समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी ३० आक्टोबरला सकाळी ११ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये वीरशैव लिंगायत समाज बांधव, भगिनी, तरुण, तरुणी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वीरशैव लिंगायत समाजाची ताकद दाखविणार आहेत.

मुलांच्या भवितव्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, हिंदू लिंगायतसह उर्वरित पोटजातींनाही आरक्षण मिळावे, या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू लिंगायतसह उर्वरित पोटजाती आरक्षणापासून वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळावे, या मागणीकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता आरक्षण प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी लिंगायत समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

Latur Collector Office
Pawar Vs Modi : नरेंद्र मोदींना घायाळ करणारा शरद पवारांचा ‘दुसरा’...

या मोर्चासाठी केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लिंगायत समाज बांधवांनी येऊन आपली एकजूट दाखवून द्यावी, गुणवत्ता असूनही हक्काचं आरक्षण नाही, भरमसाठ फी आणि शिक्षणानंतरची बेरोजगारी हे दुष्टचक्र थांबवायचं असेल, तर या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सातलिंग स्वामी यांनी केले आहे.

Latur Collector Office
INDIA Bloc News : इंडिया आघाडीतही मतभिन्नता, विधानसभेला तेवढं सोपं नाही; पवारांचे मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com