Jalna Lok Sabha Constituency : आपल्या 'भल्या आदमी'साठी अमित शाह घेणार जालन्यात सभा

Raosaheb Danve News : जालना लोकसभा मतदारसंघात दानवे सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत. विजयाची खात्री असल्याने कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा आतापर्यंत जालन्यात झाली नाही.
amit shah raosaheb danve
amit shah raosaheb danvesarkarnama

Jalna News, 29 April : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपने लोकसभेच्या जालना मतदारसंघातून ( Jalna Lok Sabha Constituency ) सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. दानवे यांची लढत महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) डॉ. कल्याण काळे ( Kalyan Kale ) यांच्याशी होत आहे. थेट होणाऱ्या या लढतीत रावसाहेब दानवे यांनी प्रचारात आघाडी घेतली असली, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दानवे यांच्यासाठी खास जालन्यात सभा घेण्याचे नियोजन केले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात दानवे ( Raosaheb Danve ) सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री असल्याने कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा आतापर्यंत जालन्यात झाली नाही. मात्र, अमित शाह ( Amit Shah ) यांनी येत्या आठ तारखेला रावसाहेब दानवे यांच्यासाठी जालन्यात सभा घेण्याचे नियोजन केले आहे. सभेची अधिकृत घोषणा येत्या तीन-चार दिवसांत केली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात अमित शाह यांनी परभणी, नांदेडमध्ये सभा घेऊन राज्यातील महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील 'इंडिया' आघाडीवर हल्ला चढवला होता. विशेषतः महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांना शाह यांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले होते.

जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. 11मे ला सायंकाळी या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याच्या तीन दिवस आधी अमित शाह जालन्यात प्रचार सभा घेतील. अमित शाह आणि रावसाहेब दानवे यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. शाह दानवे यांच्या प्रेमाने 'भला आदमी' असा उल्लेख करतात. आपल्या या 'भल्या आदमी'साठी प्रचारात कुठलीही कसर राहू नये, याची काळजी घेत शाह यांनी स्वतःहून जालन्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला.

amit shah raosaheb danve
Raosaheb Danve Net Worth : कोट्यधीश दानवेंकडे ना दुचाकी, ना चारचाकी पण आहे 18 लाखांचं पशूधन

महाविकास आघाडीने काँग्रेसचे कल्याण काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीची तुलना काँग्रेस आघाडीचे नेते 2009 च्या अटीतटीच्या लढतीशी करत आहेत. "मात्र, पंधरा वर्षांत भाजप आणि जालना लोकसभा मतदारसंघ विकासकामांच्या बाबतीत कमालीचा बदलला आहे," हा दावा करत काँग्रेस नेत्यांनी आता 2009 विसरावे, असा दानवेंनी लगावला आहे.

दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग आला असून पदयात्रा, मतदारांशी थेट संवाद, कॉर्नर बैठका, मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जालन्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजपचे 'चाणक्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांच्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

amit shah raosaheb danve
Raosaheb Danve News : 'अरे गड्याहो बिस्कीट खा अन् मला मतदान करा..!'; रावसाहेब दानवेंच्या प्रचाराचा फंडाच भारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com