Bajrang Sonwane News : मोदींनी द्वेषाचं राजकारण केलं, बीडचा पराभव चुकणार नाही; सोनवणे कडाडले

Bajrang Sonwane On Bjp : "मी केवळ निमित्त असून ही जनतेची लढाई आहे," असा एल्गार बजरंग सोनवणे यांनी पुकारला आहे.
Bajrang Sonwane
Bajrang Sonwanesarkarnama

Beed News, 8 May : भाजपला ( bjp ) जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा धर्माची ढाल समोर केली जाते आणि शेवटी तो प्रयत्न माझ्या जिल्ह्यात झाला. मात्र, भाजपला पराभव चुकणार नाही. आता द्वेषाचे राजकारण खूप झाले. पंतप्रधान मोदी ( Narendra Modi ) आले आणि त्यांनी कुठलेही आश्वासन दिले नाही. उलट आरक्षण न देण्याची आणि मुस्लिम द्वेषाची पेरणी करत बीडमधील व देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या भावना दुखवल्या आहेत, असा आरोप बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला.

भाजप उमेदवार पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत सभा झाली. पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाबद्दल सोनवणे ( Bajrang Sonwane ) म्हणाले, "भाजपने धर्मांध राजकारण बंद करावे. बीड जिल्हा फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा आहे. त्यामुळे भाजपचा नैतिक पातळीवर पराभव झाला असून आता केवळ मतदान आणि निकालाची औपचारिकता बाकी आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मोदींचं भाषण मुस्लिम द्वेषी होते. भीती दाखवून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदींनी केला. त्यांच्या भाषणानं सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचं माझे मत तयार झालं आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करणं ही सामूहिक जबाबदारी बनली आहे. मी केवळ निमित्त असून ही जनतेची लढाई आहे," असं सोनवणे यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

"भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही, यावर डॉ. आंबेडकर ठाम होते. पण, काँग्रेस दलित, आदिवासीचे व वंचितांचे आरक्षण काढून धर्माच्या नावावर मुस्लिमांना देऊ इच्छित असल्याचे सुतोवाच लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे. कर्नाटकात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. पण, सर्व मुस्लिमांना ओबीसीत समाविष्ट करुन आरक्षणात वाटेकरी केलं आहे," असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.

"जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत जगातील कुठलीच शक्ती दलित, ओबीसी व वंचितांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देऊ शकत नाही. काम करायचे नाही आणि करू द्यायचे नाही हे काँग्रेसचे धोरण आहे. बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा आणणाऱ्या काँग्रेसने आता जाहीरनाम्यात बुलेट ट्रेनचे आश्वासन दिले आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com