Pankaja Munde Statement : नाशिकमध्ये खळबळ उडवणाऱ्या 'त्या' दाव्यावर पंकजा मुंडेंचं अखेर स्पष्टीकरण...

Loksabha Election 2024 : पंकजा मुंडेंनी केलेल्या दाव्यामुळे आधीच गोंधळात असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि महायुतीतही अस्वस्थता पसरली.
Pritam Munde Pankaja Munde
Pritam Munde Pankaja Mundesarkarnama

Beed News : भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्जही दाखल केला तसेच त्यांचा प्रचाराचा धडाकाही सुरू आहे. त्यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. पण याचवेळी मुंडे यांनी केलेल्या एका विधानामुळे बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला.(Beed Loksabha Election 2024)

महायुतीतील नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी चांगलाच जोर लावला आहे. तर दुसरीकडे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही त्या जागेसाठी प्रचंड आग्रही आहे. आधी नाशिकमधून छगन भुजबळांचे नाव पुढे आल्यानंतर अचानक त्यांनी माघार घेतली. त्यानंतर कुठेतरी या मतदारसंघाचा तिढा सुटेल असं वाटलं होतं.

पण अद्यापही नाशिकच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली लागलेला नाही.याचवेळी पंकजा मुंडे यांनी प्रचारसभेत बोलताना प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करेन असं विधान केलं. या विधानामुळे आधीच गोंधळात असलेल्या नाशिकसह महायुतीतही अस्वस्थता पसरली.

Pritam Munde Pankaja Munde
Amol Mitkari News : कुणाचं काय तर कुणाचं काय? मिटकरी म्हणतात, 'महायुतीमुळे माझी 'ही' इच्छा अपूर्ण...'

पंकजा मुंडे यांनी आता आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.त्या म्हणाल्या, नाशिकविषयीचं वक्तव्य मी गमतीनं केलं होतं. लोकांनी ते समजून घेतलं नाही.पण नाशिककरांनो, अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली.

याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बीडकडे लक्ष द्या हा सल्लाही वडिलकीच्या नात्याने स्वीकारत असल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा एकप्रकारे प्रयत्नही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमधून प्रीतम मुंडे यांना पक्षाची उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याने त्या निवडून आल्या. तसेच 2019 ला पण त्यांनी बीडचं मैदान मारलं. गेल्या दहा वर्षापासून त्या बीडच्या खासदार आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागी भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.यामुळे प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचं पुढे काय होणार, त्यांचं पुनर्वसन कसं होणार याविषयी तर्क- वितर्कांना उधाण आलं आहे.

पण याचवेळी पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी भरसभेत प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करेन असं जाहीर करत त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं विधान केलं होतं. ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

Pritam Munde Pankaja Munde
Tejasvi Surya News : भाजपचा फायरब्रँड नेता अडचणीत, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com