Jayant Patil News : विकास वगैरे काही नाही, मोदींनी दम भरल्याने आमच्यातले तिकडं! जयंत पाटलांनी फटकारले

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महविकस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची गेवराईला सभा झाली.
Narendra Modi, Jayant Patil
Narendra Modi, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil News) यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी दम दिल्याने आमच्यातील काही लोक घाबरुन तिकडे गेले. विकास आणि विचारधारा त्यामागचा हेतू नव्हता, असा थेट आरोप जयंत पाटलांनी केला आहे. ही बाब नागरिकांना खटकल्याने भाजप विरूध्द चीड निर्माण झाल्याचेही पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Constituency) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची गेवराईला सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) प्रचारात सातत्याने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

Narendra Modi, Jayant Patil
Lok Sabha Election 2024: शरद पवार काँग्रेसमध्ये जातील अन् ठाकरे गटात फक्त..., नेमकं काय म्हणाले शिरसाट?

पाटील म्हणाले, कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षणाचा (OBC reservation) निर्णय 1994 मध्येच झाला आहे. उलट भाजपमधील दहाहून अधिक उमेदवारांनी आरक्षण संपवायचं असल्याने 400 हून अधिक खासदार निवडून द्या, असं आवाहन मतदारांना केलं आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशिष्ट समाजाबद्दल पंतप्रधान सातत्याने वक्तव्य करत आहेत. त्यांना समानतेची वागणूक देण्याच्या शपथेचा विसर पडला आहे. दोन महत्वाचे समाज आरक्षण मागत आहेत. पण मोदी त्यावर काहीही बोलले नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले. हे सरकार कुणबी मराठा, ओबीसी धनगर यांच्या आरक्षणा विषयी चकार शब्द काढत नाही, असेही पाटील म्हणाले.

चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा यांचे दर कमी झाले आहेत. शेतकरी वर्ग तणावाखाली आहे. पुन्हा हेच सरकार सत्तेत आले तर जाचक कर लावून महागाई आणखी वाढवेल. सध्या देशात केवळ बंदरे, विमानतळे आणि रस्ते विकत घेणारे मुठभर श्रीमंत लोकं अधिक श्रीमंत होत आहेत, अशी टीका पाटलांनी केली.

Narendra Modi, Jayant Patil
Beed Lok sabha Constituency : मराठ्यांची नाराजी थोपवण्यासाठी लातूरचे निलंगेकर उतरले बीडच्या मैदानात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com