Lok Sabha Election 2024: शरद पवार काँग्रेसमध्ये जातील अन् ठाकरे गटात फक्त..., नेमकं काय म्हणाले शिरसाट?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत दिल्याच्या चर्चेने राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे.
Sharad Pawar, Sanjay Raut, Aditya Thackeray And Sanjay Shirsat
Sharad Pawar, Sanjay Raut, Aditya Thackeray And Sanjay ShirsatSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar constituency: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत दिल्याच्या चर्चेने राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. यावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष सुरू झाला आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार (Sharad Pawar) काँग्रेसमध्ये जातील आणि ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे दोघेच राहतील, असा टोला शिरसाट यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केलं. आज महाविकास आघाडीचे काही नेते राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे कळाले. पूर्वी हेच लोक म्हणायची ईव्हीएम हॅक करून मोदी जिंकतात, अन् आता म्हणतायेत मतदानाची टक्केवारी वाढवली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण इव्हीएम हॅक होते तर टक्केवारी का वाढवायची? उगाच पराभवाचे कारण शोधण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट व महाविकास आघाडीतील कोण कोण नेते जेलमध्ये जाणार आहेत, हे कदाचित संजय राऊतांना माहीती झालं असावं, त्यांची नाव न घेता राऊत दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले असावे, असंही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणावर भाष्य करतांना उद्धव ठाकरे यांनी आम्ही बाप बदलत नसतो, अशी प्रतिक्रिया दिली. पण उद्धव साहेबांच्या तोंडून बाप बदलणे वगैरे अशी भाषा शोभत नाही आणि त्यांनी तसे बोलू नये. त्यांनी जे विचारायचे ते शरद पवारांना विचारावे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. उद्धवजींनी दाढीवाल्याचा चमत्कार पाहिला आहे, दाढीवाले योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करतात. त्यामुळे त्यांनी विना दाढीवाले जे त्यांच्याजवळ आहे त्यांना सांभाळावे, असा चिमटा शिरसाट यांनी काढला.

Sharad Pawar, Sanjay Raut, Aditya Thackeray And Sanjay Shirsat
Asaduddin Owaisi News : आता हे कराचं..! ओवेसींनी मोदींसह नवनीत राणांना ललकारलं

चंद्रकांत खैरे यांना पराभव समोर दिसू लागला आहे, त्यामुळे ते बरळत सुटले आहेत. आदित्य ठाकरे यांना काही कळत नाही, असे म्हणत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्या कोण आहेत? त्या महिलेबाबत आम्ही अपशब्द वापरू शकत नाही, सोडून द्या अशा शब्दात त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. प्रियांका चतुर्वेदी यांनी सूर्यावर थुंकताना तोंडावर थुंकी येते हे लक्षात ठेवावे.

Sharad Pawar, Sanjay Raut, Aditya Thackeray And Sanjay Shirsat
Priyanka Chaturvedi : प्रियांका चतुर्वेदींनी मारला पंजा पण घायाळ केले; शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारेंनी

कुणाच्या कपाळावर काय लिहले आहे हे 4 तारखेला कळेल, असे उत्तर त्यांना आमच्या शितल म्हात्रे यांनी दिले आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीकडे शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ती मुलाखत त्या सामनातील नोकरदाराने घेतली आहे. त्यात नवीन काहीच नाही, तेच जुने शब्द असतील, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com