Lok Sabha Election 2024 : नांदेड लोकसभेला महिला मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा ?

Nanded Politics : महिला मतदारांना पक्षाच्या प्रवाहात व संपर्कात आणण्यासाठी आत्तापासूनच विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
Nanded News
Nanded NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेड लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचा कौल महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे महिला मतदारांना पक्षाच्या प्रवाहात व संपर्कात आणण्यासाठी आत्तापासूनच विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हाळदी कुंकू, महिला मेळावे आदींच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या पक्षांना महिला मतदारांचे महत्त्व पटल्याने महिलांसाठी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष संपर्क अभियान राबवत आहेत. (Lok Sabha Election 2024)

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलं. याचा परिणाम म्हणून तीन‌ राज्यात भाजपची सत्ता आली. गेल्या महिन्यात संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. या सनाचे औचित्य साधून नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी हाळदी-कुंकू महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nanded News
Sushma Andhare News : 'देवेंद्र'पर्व राजकीय नीतिमूल्यांच्या ऱ्हासाचे; अंधारे म्हणाल्या, 'महाविकास'चे जागावाटप...

माजी आमदार अमिता चव्हाण, श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघात महिला मेळावे पार पडले. या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांच्या अडचणी समजून घेतल्या गेल्या. भारतीय जनता पक्षाच्या नांदेड लोकसभा संयोजिका प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या नवीन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

नांदेड लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पन्नास टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केवळ पुरुष मतदारांकडे लक्ष न देता महिला मतदारांसाठी विशेष संपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते महागाई, महिलांची सुरक्षा आदी विषयांवरून सरकारवर टीका करत आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे नेते मोदी सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहीती देत आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Nanded News
Shivsena News : शिवसेनेत गटबाजी, तीन जिल्हाप्रमुखांचे दोन गट; उमेदवारीसाठी थोपटले दंड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com