Nanded BJP News : मीच जिल्हाध्यक्ष म्हणणाऱ्या सुधाकर भोयर यांना नारळ, चिखलीकर समर्थकाची वर्णी...

Prataprao Patil Chikhalikar : खासदार चिखलीकरांनी आपल्या समर्थक किशोर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला.
Kishore Deshmukh, Sudhakar Bhoyar
Kishore Deshmukh, Sudhakar Bhoyar sarkarnama
Published on
Updated on

Nanded : नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील-चिखलीकर लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. अशावेळी त्यांना जिल्ह्यात पोषक वातावरण मिळावे, अंतर्गत गटबाजी मोडून काढावी, या हेतूने राज्याच्या नेत्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील अडीच वर्षे मीच नांदेड उत्तरचा भाजप जिल्हाध्यक्ष राहणार, असा दावा करणाऱ्या सुधाकर भोयर यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

भोयर यांच्या जागेवर चिखलीकर (Prataprao Chikhalikar) समर्थक किशोर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील पत्र दोघांनाही पाठवले आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप (BJp) करीत आहे, तर दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजी व एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सपाटा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अर्धापूर शहरात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत नांदेड उत्तरचे अध्यक्ष सुधाकर भोयर यांनी मीच 2026 पर्यंत अध्यक्ष राहणार, असा दावा केला होता.

Kishore Deshmukh, Sudhakar Bhoyar
Uddhav Thackeray : देशासाठी 'मन की बात', अन् गुजरातसाठी 'धन की बात'

भोयर यांच्या निवडीला विरोध असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चोबांधणी करून त्यांना पदावरून हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. यात त्यांना यश आले असून नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅड. किशोर देशमुख यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र मंगळवारी (ता. 23) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. भाजपच्या जिल्ह्याध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या काही महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भोयर यांची वरिष्ठांकडे तक्रार

जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या कार्यपद्धतीवर व त्यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आपली कैफियत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडली होती. काही पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करीत होते, तर काही पदाधिकाऱ्यांनी थेट नागपूरला जाऊन तक्रारींचा पाढा वरिष्ठ नेत्यांपुढे वाचला होता. पदाधिकारी निवडताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे, आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना पद देणे आदी आरोप भोयर यांच्यावर कार्यकर्ते उघडपणे करत होते. या सर्व आरोपांची दोनसदस्यीय समितीने चौकशी करून प्रदेशाध्यक्षांना अहवाल पाठविला होता.

चिखलीकरांचे चोख प्रत्युत्तर

खासदार चिखलीकरांनी आपल्या समर्थक किशोर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बालाजी बच्चेवार यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांतच चिखलीकरांनी किशोर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करून पक्षातील विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे.

अर्धापूर शहराला दुसऱ्यांदा मान

अर्धापूर शहराला जिल्हाध्यक्ष होण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. जेव्हा जिल्ह्यासाठी एकच अध्यक्ष असायचा तेव्हा युतीच्या शासनकाळात 1996 मध्ये प्रा. गणपतराव राऊत जिल्हाध्यक्ष झाले होते. तब्बल २८ वर्षांनंतर किशोर देशमुख हे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. यानिमित्ताने अर्धापूरला दुसऱ्यांदा जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

R...

Kishore Deshmukh, Sudhakar Bhoyar
Sanjay Raut : बबनराव घोलप कुठे गेले ? संजय राऊत म्हणाले…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com