मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची ( Maratha Reservation ) धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांना माघारी पाठवलं. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील-चिखलीकर ( Prataprao Patil Chikhalikar ) यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं ते कोंढा गावात मतदारांच्या भेटी-गाठीसाठी आले होते.
'एक मराठा-लाख मराठा'सह विविध घोषणा देत मराठा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. मराठा समाजाचा रोष पाहून अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनीही काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नेमकं काय घडलं?
चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण कोंढा गावात गावात पोहाेचले. तेव्हा गावकरी एकत्रित जमा झाले आणि अशोक चव्हाण यांना विरोध दर्शवला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी असल्याचं म्हणत गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तरुणांनी थेट चव्हाणांची कार अडवत घेराव घातला. त्यामुळे कार घेऊन पुढं जाता येत नव्हतं.
अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत अशोक चव्हाणांच्या कारसमोरील तरुणांना बाजूला केलं. रोष पाहता चव्हाणांनी परत जाण्यातच धन्यता मानली. चव्हाणांचा ताफा गावातून निघून गेल्यावरही 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.