Ashok Chavan News : 'तेव्हा जर मी भाजपमध्ये जाण्याचं धाडस दाखवलं नसतं, तर..' ; अशोक चव्हाणांचं विधान!

Nanded BJP News : भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
Ashok Chavan News
Ashok Chavan News Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan and Loksabha election : 'काँग्रेसमध्ये असताना देशात मोदी गॅरंटीवर नाही, तर जनतेचा काँग्रेसवर विश्वास असल्याचे सांगत टीका करणारे खासदार अशोक चव्हाण आता मात्र मोदींवर देशातील जनतेचा विश्वास असल्यानेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगत आहेत.' भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.

शिवाय राज्यातील एक मोठा नेता पक्ष सोडण्यापूर्वी माझ्या आईसमोर रडला होता, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. तेव्हा अशोक चव्हाण यांनी मी सोनिया गांधींना भेटलोच नाही, असे म्हणत राहुल गांधी यांची टीका हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाणांना स्थान दिले आहे. त्यामुळे चव्हाण आता काँग्रेसवर हातचे न राखता टीका करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan News
Ambadas Danve On BJP : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंचवीस टक्के दुसऱ्या पक्षातून आलेले... दानवेंचा टोला

भाजपमध्ये प्रवेश आणि राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर अर्धापूर येथे झालेल्या सत्कार समारंभात अशोक चव्हाण चांगलेच खुलले. 'देशातील जनतेचा मूड लक्षात घेऊनच आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याची कबुली चव्हाण यांनी दिली. आपण जनतेचा मूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेसाठी भाजपमध्ये प्रवेशाचा धाडसी निर्णय घेतला. तो जर घेतला नसता, तर मला विरोधी पक्षातच बसावे लागले असते,' असेही चव्हाण म्हणाले.

याशिवाय 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. देशातील जनता त्यांच्या सोबत आहे. अयोध्येत पार पडलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. काँग्रेसची सत्ता दिल्लीत येणार नाही, असे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे भाजपत गेलो, तेव्हा जर हे धाडस दाखवले नसते तर विरोधी पक्षात बसावे लागले असते. विकासकामांना निधी मिळणे अवघड झाले असते. नांदेड, मराठवाड्यासह राज्यातील विकासकामांना गती मिळावी यासाठी भाजपत जाण्याच्या निर्णय घेतला, ' असंही चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan News
Nanded BJP News : अशोक चव्हाणांकडून प्रचार लोकसभेचा अन् तयारी मुलीला आमदार करण्याची...

याचबरोबर 'या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल. मी घेतलेला निर्णयासोबत राहा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. तसेच 'नांदेड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे.

ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सहकार्य करा. येत्या पाच वर्षांत विकसित नांदेड पाहायला मिळेल', असा दावाही चव्हाण यांनी केला. तर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आपण तयार असल्याचे सांगत प्रताप पाटील चिखलीकर यांनीही आमच्यात आता कसलेच मतभेद नसल्याचे सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com