Omraje Nimbalkar News : "राज्यातील 'अ‍ॅम्ब्युलन्स' घोटाळ्यात कुणी कुणी खाल्लं?" ओमराजेंनी सावंतांना हिणवलं

Tanaji Sawant Ambulance Fraud : लोकसभा निवडणुकीत 'अ‍ॅम्ब्युलन्स' घोटाळ्यावरून तानाजी सावंत यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
Tanaji sawant Omraje nimbalkar
Tanaji sawant Omraje nimbalkarsarkarnama

Dharashiv News : मर्जीतील ठेकेदार कंपन्यांच्या भल्यासाठी तब्बल 10 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढून ते त्यांच्याच घशात घातलेला 'अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा' ( Ambulance Fraud Case ) अजूनही सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची पाठ सोडत नाही. हा घोटाळ्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) प्रचारात विरोधक तापवत असून, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी 'अ‍ॅम्ब्युलन्स'वरून सरकारची इभ्रतच चव्हाट्यावर आणली आहे.

धाराशिवमध्ये सत्ताधारी विरोधकांमधील प्रचाराचा भडका उडत असतानाच ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांनी या घोटाळ्यावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांना हिणवले आहे. त्यामुळे 'अ‍ॅम्ब्युलन्स' घोटाळ्याचा भुंगा सावंतांच्या पाठिशी लागणार, हे नक्की.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओमराजे काय म्हणाले?

"आमच्यावर टक्केवारीचा आरोप करणाऱ्या तानाजी सावंत यांना एवढंच विचारायचं आहे की, तुमच्यासारखं भ्रष्ट मार्गानं पैसा कमवला असता, तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये पालथं पडलो असतो. आम्ही इमानदार आहोत, म्हणून खुद्दार होऊन कुणाच्या बापाला न घाबरता इथे उभे राहिलो आहे. तुम्ही बेईमान आहात, त्यामुळे तिकडं सुद्ध होण्यासाठी पालथं पडले आहात," असा हल्लाबोल ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला आहे.

"परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं आम्ही गरीब आहोत. पण, अख्ख्या राज्यातील 'अ‍ॅम्ब्युलन्स' घोटाळ्यात शेण कुणी खाललं. या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव तानाजी सावंत यांनी जाहीर करावं," असं थेट आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी दिलं आहे.

Tanaji sawant Omraje nimbalkar
Ambulance Scam: तानाजी सावंतांच्या आरोग्य विभागाचा आणखी एक अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा!

रोहित पवार यांनीही केला होता आरोप

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात सुमारे दहा हजार कोटी रूपयांचा 'अ‍ॅम्ब्युलन्स' महाघोटाळा केल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. आरोग्य विभागातील बड्या धेंडांना हाताशी धरून करण्यात आलेल्या या घोटाळ्यातील पैसा निवडणुकीसाठी वापरण्याचा प्रयत्न आहे. याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही रोहित पवार यांनी केला होता.

Tanaji sawant Omraje nimbalkar
Ambulance Tender Scam : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा; विरोधकांचा सायरन वाजणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com