Lok Sabha Election 2024 : स्वार्थापोटी शरद पवारांना धोका देणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल; क्षीरसागरांनी डागली तोफ!

Sandip Kshirsagar News : संदीप क्षिरसागर म्हणाले, 'बीड जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा जिल्हा आहे.'
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Beed News : जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या जीवावर मोठे झाले. स्वार्थापोटी या नेत्यांनी शरद पवारांनाच धोका दिला. मात्र, अशा भूमिका बदलून स्वार्थापोटी जनतेला सोडून देणाऱ्या नेत्यांना जिल्ह्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
BJP Dinesh Sharma News : ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकमेकांना संपवत आहेत, भाजप नेत्याची जोरदार टीका !

बीड (Beed) लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप क्षिरसागर म्हणाले, 'बीड जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा जिल्हा आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Congress Vs NCP Ajit Pawar : लोकसभेत पंजा Vs घड्याळ आमना-सामना नाहीच !

'जिल्ह्यातील अनेक नेते शरद पवारांच्या (Sharad Pawar) जीवावर मोठे झाले. परंतु, स्वार्थापोटी अनेकांनी पक्ष बदलले आहे. मात्र, जनता आजही शरद पवारांसोबत आणि महाविकास आघाडीसोबत असल्याचा विश्वास संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. सुज्ञ मतदार नेत्यांच्या स्वार्थी व धोका देण्याच्या प्रवृत्तीवर नाराज आहेत. म्हणूनच आज सर्वत्र महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे. नेत्यांच्या बदलत्या भूमिकेचा समाचार मतदार लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून घेतील, आणि नेत्यांना त्यांची जागा दाखवतील,' असा विश्वासही संदीप क्षीरसगर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com