Lok Sabha Election 2024 : '400 पार' मध्ये भुमरे मामा पाहिजेच; मुख्यमंत्र्यांचे संभाजीनगरकरांना आवाहन!

Chhatrapati Sambhajinagar News : "ऐरे गैरे असे कुणालाही निवडून देऊ नका, 'नो खैरे ओनली भुमरे.. एकच मामा भुमरे मामा"
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली ती याच संभाजीनगर आणि मराठवाड्यात. इथल्या जनतेने कायम शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम केले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीच्या अबकी बार चौर सौ पारमध्ये आपले संदीपान भुमरे मामा निवडून आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Latest Marathi News)

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत रॅली काढण्यात आली होती. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, रमेश बोरणारे यांच्यासह महायुतीचे आमदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रॅलीनंतर गुलमंडी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. 'नो खैरे ओनली भुमरे.. एकच मामा भुमरे मामा' या घोषणांचा उल्लेख करत जालन्यात रावसाहेब दानवे आणि संभाजीनगरातून भुमरे लोकसभेत निवडून गेले पाहिजे, असे आवाहन केले.

इथल्या जनतेने शिवसेना, धनुष्यबाण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम केले. गेल्यावेळी थोडी गडबड झाली, या वेळी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार नाही. धनुष्यबाणच निवडून येणार, चार सौ पारमध्ये संदीपान भुमरे पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्यावर टीका करत आहेत, याचा मोबाईलवरील व्हिडिओ उपस्थितींना माईकवरून ऐकवत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखा फास्ट रंग बदलणारा सरडा आपण पाहिला नाही, अशी टीका केली.

Lok Sabha Election 2024
BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...

रोटी, कपडा, मकान देणारे आपले पंतप्रधान आहेत. भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा त्यांच्यावर नाही, ते बेदाग आहेत. बाप एक नंबरी, तर बेटा दस नंबरी असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदेंनी निशाणा साधला. मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना पोटशूळ उठला आहे. भुमरेंचा फाॅर्म भरायला एवढ्या संख्येने तुम्ही आलात, त्यामुळे त्यांचा विजय पक्का असल्याचा, दावाही शिंदे (EKnath Shinde) यांनी केला.

Lok Sabha Election 2024
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...
Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

ऐरे गैरे असे कुणालाही निवडून देऊ नका, या जिल्ह्यात आपले पाच आमदार आहेत. एक कन्नडचा राहिला आहे, पण येत्या निवडणुकीत त्याचाही टांगा पलटी करायचा आहे, असे आवाहन शिंदे यांनी केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा साधा उल्लेखही केला नाही. एकूणच त्यांचा रोख ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावरच होता. संभाजीनगरमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार असल्याचे शिंदे यांनी यातून स्पष्ट केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com