Lok Sabha Election: महायुतीचे मराठवाड्यातील 7 उमेदवार घोषित, संभाजीनगरचा घोळ संपेना

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha: आमदार संजय शिरसाट यांनी संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच असून आमचा उमेदवार ठरल्याचं वारंवार सांगून झालं आहे. परंतु उमेदवार कोण? तो जाहीर कधी करणार? याचे मात्र दररोज नवीन मुहूर्त सांगितले जात आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha
Chhatrapati Sambhajinagar Lok SabhaSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पंधरा दिवसांवर आले आहे. महायुती, महाविकास आघाडी, (MVA) वंचित या पक्षाचे मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. महायुतीने आठ पैकी सात लोकसभा मतदारसंघांचे (Lok Sabha Constituency) उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु मराठवाड्याची (Marathawada) राजधानी संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गट लढवणार की भाजप? हा घोळ अद्याप मिटलेला नाही.

या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे संभाजीगनगरचा (Sambhajinagar) निर्णय रखडला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच असून आमचा उमेदवार ठरल्याचं वारंवार सांगून झालं आहे. परंतु उमेदवार कोण? तो जाहीर कधी करणार? याचे मात्र दररोज मुहूर्त सांगितले जात आहेत. काल शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा उद्या केली जाईल, असे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्धा दिवस उलटला तरी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नरसी येथे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला ते संबोधित करणार आहेत. यावेळी संभाजीनगरच्या जागेसंदर्भात महायुतीच्या नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha
Lok Sabha Election 2024 : बेरोजगारांना काम, शेतकऱ्यांच्या उसाला दाम हीच माझी औकात; मुंडेंच्या टीकेला सोनवणेंचं प्रत्युत्तर

कदाचित आज सायंकाळी किंवा रात्री उशीरा उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे बोलले जाते. दोन्ही पक्ष आपापल्या दाव्यावर ठाम असल्याने राज्यातील केवळ संभाजीनगरच नव्हे तर नाशिक (Nashik), पालघर, ठाणे, रत्नागिरी सिंधूदुर्ग या मतदारंसघाचा निर्णयदेखील अद्याप झालेला नाही. तर या ठिकाणचे उमेदवार लवकर जाहीर करावेत, अशी मागणी महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांकडे करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha
Beed Lok Sabha Election :'पोलिस संरक्षणात विकासकामे सांगण्याची दुर्दैवी वेळ'; बजरंग सोनवणेंची मुंडे भगिनींवर टीका!

संभाजीनगरची जागा भाजपकडे (BJP) घ्या, यासाठी इच्छूक उमेदवार भागवत कराड यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दररोज किमान एका तरी स्थानिक नेत्याचा फोन ही जागा आपल्याकडे घ्या, म्हणून जात आहे. त्यामुळे संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला दिली जाणार की भाजपला हे गुलदस्त्यात आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com