Lok Sabha Election 2024: बाळासाहेबांचा शाप लागणार; मोदी सत्तेतून पाय उतार होणार...

PM Narendra Modi: "बाळासाहेबांच्या विचारांसाठी मी जगेन, माझ्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. मी ते कधीही विसरू शकत नाही. शिवाय आज आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही केला आहे."
Uddhav Thackeray, Narendra Modi, Vijay Wadettiwar
Uddhav Thackeray, Narendra Modi, Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar On PM Narendra Modi: शिवसेना फोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना किती वेदना झाल्या असतील? आणि म्हणूनच बाळासाहेबांचा शाप पंतप्रधान नरेंद्र मोदींना लागला आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लातूर येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मोदींनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं.

यावेळी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता पराजय दिसत आहे, त्यामुळे उद्या आपण सत्तेतून गेलो तर कोणीतरी आपणाला सांभाळणारे असले पाहिजे अशा विचाराने ते आता उद्धव ठाकरेंबद्दल जवळीकतेची भाषा करीत आहेत. शिवसेना (Shivsena) फोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना किती वेदना झाल्या असतील? आणि म्हणूनच बाळासाहेबांचा शाप मोदीजींना लागला आहे. त्यामुळेच मोदी (Narendra Modi) सत्तेतून पाय उतार होणार, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं. शिवाय बाळासाहेबांचे सुपुत्र सोडून दुसऱ्याला मुख्यमंत्री करणे ही कुठली नैतिकता आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं काय म्हणाले मोदी?

एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे माझे शत्रू नाहीत, उद्या जर त्यांच्यावर काही संकट आलं तर त्यांची मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन. बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मानसन्मान करत आलोय आणि यापुढेही करेन. तसेच बाळासाहेबांच्या विचारांसाठी मी जगेन, माझ्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. मी ते कधीही विसरू शकत नाही. शिवाय आज आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही केला आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray, Narendra Modi, Vijay Wadettiwar
Lok Sabha Election 2024 : उत्तर-मध्य मुंबईत तिहेरी लढत, काँग्रेस-भाजपविरोधात 'MIM'चा उमेदवार मैदानात

मोदींच्या याच वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. बाळासाहेबांचे सुपुत्र सोडून दुसऱ्याला मुख्यमंत्री करणे ही कुठली नैतिकता आहे? असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. शिवाय यावेळी त्यांनी भाजपने भ्रष्टाचारावर केलेल्या टीकेलाही सडेतोड उत्तर दिलं. वडेट्टीवार म्हणाले, उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी परिस्थिती सध्या आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना सोबत घेऊन भाजपने तिजोरीच्या चाव्या दिल्या. त्यामुळे अजित पवारांनी भाजप सुरक्षित आहे म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. असे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले व्यक्ती तुम्हाला कशी चालते? असा प्रश्न उपस्थित करत अशा धर्मांध शक्ती सत्तेवर येऊ नयेत म्हणून, शरद पवार लढतायत याचा आम्हाला अभिमान आहे असंही वडेट्टीवारांनी म्हटलं.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com