Lok Sabha Election 2024 : लोकसभा प्रचारासाठी खास तयार केलेली अंबादास दानवेंची व्हॅनिटी व्हॅन कुठंय?

Ambadas Danve Vanity Van : चंद्रकांत खैरेंच्या हस्ते दानवेंच्या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन आणि नारळ वाढवण्यात आले होते. पण..
Ambadas Danve Vanity Van
Ambadas Danve Vanity Vansarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आता पक्षात प्रमोशन झालेले शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) प्रचारासाठी खास व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेतली होती. डिसेंबर 2023 मध्ये म्हणजे पाच महिन्यांपूर्वी जेव्हा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अंबादास दानवे प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना या व्हॅनिटीचे नारळ वाढवून उद्घाटन केले होते.

विशेष म्हणजे लोकसभा उमेदवारीसाठी दानवे ( Ambadas Danve ) यांचे स्पर्धक असलेल्या चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांच्या हस्ते या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन आणि नारळ वाढवण्यात आले होते. पण, उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत खैरेंनी बाजी मारली आणि चार महिन्यांपूर्वी प्रचारासाठी सज्ज असलेली अंबादास दानवे यांची व्हॅनिटीही गायब झाली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी शिवसेना नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्यावर सोपवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या शिवाय मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव सह राज्यातील इतर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भारही दानवे यांच्यावर आहे. मराठवाड्यात पारा चाळीसवर गेला असताना वातानुकूलित आणि सर्व सोयींनी युक्त, अशी अंबादास दानवे यांनी तयार करून घेतलेली व्हॅनिटी व्हॅन कुठे आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

सोमवारी ( 22 एप्रिल ) चंद्रकांत खैरे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना ( ठाकरे गट ) नेते आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यासाठी खास मुंबईहून आले होते. रखरखत्या उन्हात या सगळ्या नेत्यांनी मिरवणुकीत सहभागी होत उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंसह खैरे, दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, अमित देशमुख व महाविकास आघाडीचे नेते घामाघुम झाले होते. अशावेळी या नेत्यांना थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी दानवेंच्या व्हॅनिटीचा उपयोग करता आला असता. पण, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अंबादास दानवे यांनी प्रचारासाठी तयार केलेली व्हॅनिटीही गायब केली की काय? अशी चर्चा सुरू आहेत.

लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल आणि त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी रखरखत्या उन्हात फिरताना थोडासा आराम करता यावा या हेतून अंबादास दानवे यांनी डिसेंबर 2023 मध्ये एक आलिशान व्हॅनिटी व्हॅन बनवून घेतली होती. या व्हॅनच्या उद्घाटनाचा नारळ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते वाढवण्यात आला होता. तेव्हा दानवे यांना कदाचित याची कल्पनाही नसले की उमेदवारी खैरे यांना मिळेल. पण खैरे यांच्या ज्येष्ठतेचा मान ठेवत दानवे यांनी व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाचा नारळ खैरे यांच्या हस्ते फोडला होता.

शिवाय व्हॅनिटीतल्या मुख्य सीटवरही खैरे यांना बसवले होते. यावरून तेव्हा शिंदे सेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दोघांपैकी एकाने माघार घेतली असल्याचा दावा करत खैरेंच्या हाताने दानवेंच्या व्हिनिटीचे उद्घाटन याला सहजतेने घेऊ नका, असा चिमटा काढला होता. व्हॅनिटी उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे दोघांचे पॅचअप झाले, असा लावत शिरसाट यांनी खैरे यांच्याऐवजी बहुदा लोकसभेसाठी अंबादास दानवे यांना आशीर्वाद मिळाल्याचे भाकीत वर्तवले होते.

Ambadas Danve Vanity Van
Chhatrapati sambhaji nagar Constituency: छत्रपती संभाजीनगरात तिरंगी लढत ; महायुती- आघाडी- एमआयएम भिडणार!

खैरेंच्या हस्ते दानवेंनी आपल्या व्हॅनिटीचे उद्घाटन केले ही साधी गोष्ट नाही. कदाचित 'मातोश्री'वरून खैरेंना आता तुम्ही थांबा, अन् अंबादास दानवेंना आशीर्वाद द्या, असे सांगितले असावे असा टोला शिरसाट यांनी तेव्हा लगावला होता. मात्र, दानवे यांच्याप्रमाणेच शिरसाट यांचाही अंदाज चुकला आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांनाच दिली. पण, लोकसभेच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली तरी दानवे यांची ती व्हॅनिटी व्हॅन मात्र कुठेच दिसली नाही. त्यांच्या या न दिसलेल्या व्हॅनिटीची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Ambadas Danve Vanity Van
Sanjay Jadhav News : "परभणीचे मोदी आम्हीच, 26 एप्रिलनंतर जानकर रेल्वे स्टेशनवर झोपणार, तर गुट्टे...", जाधवांचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com