Maharashtra Politics News : परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Lok Sabha Constituency) शिवसेना (ठाकरे गट) संजय ऊर्फ बंडू जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर यांच्यात लढत होते. पण, परभणीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा चांगलाच तापला आहे.
यावरून जाधव आणि जानकर यांच्यात तू-तू-मैं-मैं सुरू आहे. यातच जाधवांनी जानकरांवर हल्लाबोल केला आहे. "26 एप्रिलनंतर जानकर रेल्वे स्टेशनवर आणि आमदार रत्नागर गुट्टे तुरुंगात झोपणार, मग जनतेनं काय करायचं?" असा खोचक सवाल संजय जाधवांनी उपस्थित केला आहे.
संजय जाधव म्हणाले, "जानकरांना ( Mahadev Jankar ) मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे. माढ्याची आणि बारामतीची जागा सेफ करण्यासाठी जानकरांना परभणीत पाठवलं आहे. जातीचं ध्रुवीकरण करून मराठवाड्यात विशेषत: महाराष्ट्रात याचा फायदा घ्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी एका ठिकाणी म्हटलं, 'मी ओबीसीतून येतो.' देशाच्या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं जातीचा उल्लेख करावा ही शोकांतिका आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात, 'आमचा डीएनए मोदी आणि शाहांचा आहे.' तुम्हाला नेमकं काय साध्य करायचा आहे, हे कळलं नाही. अशापद्धतीनं संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती बोलत असेल, तर सर्वसामान्य जनतेनं काय समजायचं. हा खूप गंभीर विषय आहे," अशी चिंता जाधवांनी व्यक्त केली.
"26 एप्रिलनंतर जानकर रेल्वे स्टेशनवर आणि रत्नागर गुट्टे तुरुंगात झोपणार आहेत. मग जनतेनं काय करायचं? जानकर म्हणतात, 'मी पाच-पाच वर्षे आई-वडिलांना भेटलो नाही.' पण, आई-वडिलांनाच पाच-पाच वर्षे भेटत नाही, तर जनतेला काय भेटणार? तुका म्हणे पाहिजे जातीचे. येड्या गबाळ्याचं काम नाही. परभणीतील जनतेची एकमेकांशी नाळ जुळली आहे. जनतेच्या सुखात दु:खात, अडीअडचणीत मदतीला धावून जाणारे आम्ही आहोत," असं जाधवांनी सांगितलं.
"मोदी-मोदी करून अंधभक्त बोलतील. पण, परभणीतील मोदी आम्हीच आहोत. तुम्ही कुणाला मोदी म्हणून फिरत आहात? उद्या काही प्रसंग आला, तर मोदींना फोन लावणार आहात का? किंवा मोदी परभणीत येणार आहेत का?" असा सवाल जाधवांनी उपस्थित केला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.