Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी आडसकरांवर दुहेरी जबाबदारी; माजलगाव, केजमध्ये घातले लक्ष

Political News : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रचारात प्रत्येक विधानसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह महायुतीच्या घटक पक्षांतील नेते उतरले आहेत.
Ramesh Adaskar, Pankaja Munde
Ramesh Adaskar, Pankaja Munde Sarkarnama

Beed News : बीड लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने महायति व महाविकास आघाडीकडून जोरात प्रचार सुरु आहे. प्रचार शिगेला पोचल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकही आरोपाची संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांचे मेळावे, सभा, संवाद दौरे, डोअर टु डोअर सुरु आहे. माजलगाव मतदारसंघातील भाजप नेते रमेश आडसकरांवर देखील दुहेरी जबाबदारी आहे. माजलगाव मतदारसंघासह केजमध्येही लक्ष घातले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या (Bjp) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Ncp) पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonvane) यांच्यात ‘कांटे कि टक्कर’ सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारात प्रत्येक विधानसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह महायुतीच्या घटक पक्षांतील नेते उतरले आहेत. (Pankaja Munde News)

Ramesh Adaskar, Pankaja Munde
Sharad Pawar News : शरद पवारांची बारामतीकरांना साद; तुमचा निर्णय...

विशेष म्हणजे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात उभारलेले आणि आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात दंड थोपटण्याची तयारी असलेले नेतेही पंकजा मुंडे यांच्यासाठी एकत्र आल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे. दरम्यान, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे रमेश आडसकर, मोहन जगताप आदी प्रचार करत आहेत.

सुरुवातीला एकमेकांच्या विरोधात लढलेले सोळंके व आडसकर दोघे एकत्रीत पंकजा मुंडेंच्या प्रचारात होते. दरम्यान, आडसकर यांनी मागची विधानसभा माजलगाव मतदारसंघातून लढविली असून आगामी निवडणुकीसाठीही त्यांची याच मतदारसंघातून तयारी सुरु आहे. मात्र, त्यांचे प्राबल्य केज मतदारसंघात देखील आहे. त्यांचे वडिल दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर या मतदारसंघातून आमदार होते.

केज बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांचे प्रभूत्व आहे. या मतदार संघातून पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा, त्यांचे पती अक्षय मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा पंकजा मुंडे खिंड लढवत आहेत. संवाद बैठका, डोअर टु डोअर प्रचारात मुंदडा व्यस्त आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे केज मतदारसंघातील आहेत. त्यांचाही याच मतदारसंघात साखर कारखाना असून स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांचे प्रभूत्व आहे. होमपिचमध्ये बजरंग सोनवणे यांनी लिड घेऊ नये म्हणून मुंदडांच्या मदतीला आडसकरही उतरले आहेत. त्यांनी सुरुवातीलाच केज शहरात समर्थकांचा मेळावा घेतला होता. पुन्हा त्यांनी माजलगाव मतदारसंघात प्रचार सुरु केला. परंतु, आता निवडणुक अखेरच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे मग आडसकरांना माजलगाव - केज अशी दुहेरी जबाबदारी पेलावी लागत आहे.

आडसकर यांनी स्वत:च्या आडस गावात आणि या भागात बैठका घेतल्या. तसेच, युसूफवडगाव, बनसारोळा भागात मुंदडांच्या सोबतीने त्यांनी संयुक्त दौरे केले. केज भागात आडसकरांना माणणारे तिन पिढ्यांचे कार्यकर्ते असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांना केजमध्येही लक्ष घालण्यास पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Ramesh Adaskar, Pankaja Munde
Sharad Pawar : 'सत्तेचा माज उतरवायला वेळ लागणार नाही', शरद पवारांनी ठणकावले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com