Parbhani Lok Sabha Election Result 2024 Live: परभणीत 'मशाल' पेटली; जानकर यांच्या शिट्टीची हवा गुल...

Parbhani Lok Sabha Election Result 2024 Live: स्थानिक विरुद्ध उपरा तसेच मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षामुळे जातीय वळणावर गेलेली लोकसभेच्या परभणी मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होताना दिसत आहे.
Mahadev Jankar, Sanjay Jadhav
Mahadev Jankar, Sanjay JadhavSarkarnama

Parbhani Lok Sabha Election Result 2024 Live: स्थानिक विरुद्ध उपरा तसेच मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षामुळे जातीय वळणावर गेलेली लोकसभेच्या परभणी मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी महायुतीच्या महादेव जानकर यांच्याविरोधात पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी आठव्या फेरीअखेरी अखेरपर्यंत कायम ठेवली आहे.

आठव्या फेरीचा निकाल हाती आला तेव्हा संजय जाधव यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यावर तब्बल 37 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे परभणीत शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटणार हे जवळपास निश्चित झाले आहे. परभणीत रासपचे उमेदवार महादेव जानकर यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) राज्यातील भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेत मोठी ताकद उभी केली होती.

मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या परभणीच्या पारंपारिक मतदारांनी पक्षात फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहत गद्दारांना माफी नाही, असा संदेश दिला आहे. याशिवाय सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर बाहेरचा उमेदवार लादला तर तो स्वीकारला जाणार नाही, असा मेसेजही सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून आला आहे.

परभणी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाची निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशा वळणावर गेल्याचा मोठा फायदा संजय जाधव यांना होताना दिसतो आहे. मराठा आरक्षण आणि यावरून राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात असलेला रोष ठाकरे गटाच्या बाजूने मतांच्या रुपात वळल्याचे चित्र आहे.

Mahadev Jankar, Sanjay Jadhav
Vidarbha Lok Sabha Election Result 2024 Live: शिकारी खुद यहाँ शिकार बन गया! रामटेक यवतमाळमध्ये शिंदे घायाळ

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांच्या प्रचारानिमित्त घेतलेल्या जाहीर सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. याचाही मोठा फायदा संजय जाधव यांना होताना दिसत आहे. शिवाय जाधव यांनी स्वतः मतदानानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले होते.

एकूणच या सगळ्या परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे दिसत आहे. महादेव जानकर यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेत वातावरण निर्मिती केली होती. परंतु त्यांना मतदारसंघात अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणाविरोधात असलेल्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

Mahadev Jankar, Sanjay Jadhav
Chandrashekhar Bawankule : जैसी करणी वैसी भरणी! बावनकुळेंच्या प्रदेशाध्यक्षपदावर पडणार कुऱ्हाड?

संजय जाधव यांची आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली तर त्यांनी केलेल्या दाव्यानुसार ते एक लाखांच्या मताधिक्याने हॅटट्रीक साधू शकतात. आठव्या फेरीच्या निकाला अखेरीस संजय जाधव यांना एक लाख 65 हजार दहा एवढी मते मिळाली आहेत. तर महायुतीच्या जानकर यांना एक लाख 28 हजार 20 आणि वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव 27 हजार 710 मते मिळाली आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com